District Bank Executive Director Jitendra Deshmukh while inaugurating the society's ATM. Neighbor BJP Adv. Kishore Kalkar, Chairman of the organization Vijay Mahajan. esakal
जळगाव

Jalgaon News : सोसायटीत शेतकऱ्यांसाठी ‘एटीएम’ची सुविधा; गैरसोय होणार दूर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एरंडोल विविध कार्यकारी सहकारी सोसायाटीच्यावतीने शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या एटीएमचे उदघाटन जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष विजय महाजन अध्यक्षस्थानी होते.( ATM facility for farmers in society jalgaon news)

भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख ॲड. किशोर काळकर प्रमुख पाहुणे होते. जिल्ह्यात शेतऱ्यांसाठी एटीएम सुरू करणारी एरंडोल सोसायटी पहिलीच संस्था ठरली आहे.

संस्थेच्या कार्यालयात शेतकऱ्यांसाठी एटीएमची सुविधा सोसायटीच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. एटीएममुळे शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे. यावेळी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी संस्थेने सुरू केलेल्या एटीएमबद्दल समाधान व्यक्त केले. संस्थेच्या संचालक मंडळात कोणतेही मतभेद नसल्यास वेगाने प्रगतीकडे वाटचाल करते, असा विश्वास व्यक्त केला.

भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख ॲड. किशोर काळकर यांनी सोसायटीने शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून एटीएम सुरु करण्याचा घेतलेला निर्णय प्रेरणादायी असल्याचे सांगितले. संस्थेतर्फे सभासदांसाठी सुरू केलेल्या विविध उपक्रमांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष विजय महाजन यांनी संस्थेत सर्व पक्षांचे पदाधिकारी आहेत, मात्र शेतकरी हिताचे निर्णय एकमताने घेतले जात असल्याचे सांगितले.

आगामी काळात संस्थेच्या मोकळ्या जागेवर व्यापार संकुलाचे बांधकाम करणे, संस्थेचा पेट्रोलपंप सुरू करणे, शेतमाल तारण कर्ज सुविधा सुरू करणे आदी उपक्रम राबवून संस्था आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तज्ज्ञ संचालक जावेद मुजावर यांनी सूत्रसंचालन केले. माजी अध्यक्ष दुर्गादास महाजन यांनी आभार मानले.

कार्यक्रमास संचालक राजेंद्र पाटील, माजी सभापती सुनील पवार, माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन, राजेंद्र चौधरी, समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, पंडित पाटील, ईश्वर पाटील, युवराज महाजन, राजधर महाजन, इच्छाराम महाजन, शांताराम महाजन, नितीन महाजन, सुरेश देशमुख, वामन धनगर, एजाज एहमद, सुमनबाई महाजन, निर्मलाबाई महाजन, ज्ञानेश्वर पाटील, रघुनाथ ठाकूर, संस्थेचे सचिव बापू महाजन यांच्यासह सभासद व शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी युवराज महाजन, भगवान महाजन, निंबा महाजन, मन्साराम महाजन, बाळ (मामा) जोशी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. संस्थेतर्फे एटीएम सुरू करण्यात आल्याबद्दल उपस्थित सभासदांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT