crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : चोपड्यात पोलिस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; 5 जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : कत्तलखान्यात जाणारे अवैध वाहतूक पकडल्याचा राग मनात ठेवून एका विशिष्ट टोळक्याने एकत्रित येऊन सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करून दुखापत केल्याची घटना घडली.

या प्रकरणी पोलिस ताफा मागविण्यात येऊन हल्लेखोरांची धरपकड करण्यात आली असून, पाच जणांना अटक करण्यात आली असून दोन जण फरार झाले आहेत.(attack on police officer in Chopda jalgaon crime news)

अवैधरीत्या गोवंश जातीच्या जनावरांच्या वाहतूक करणाऱ्या लोकांवर पोलिस कारवाई करीत असतात याचा राग मनात धरून सहाय्यक निरीक्षक अजित सावळे व पोलिस कर्मचारी संतोष पारधी यांना शेतपुरा भागात जाणाऱ्या जुना यावल रोडवर नगरपालिकेच्या कत्तलखान्याजवळ सार्वजनिक जागी शुक्रवारी (ता. १) रात्री अकराला सुमारास शेख साजिद शेख सलीम कुरेशी, शेख सऊद शेख सलीम कुरेशी, शेख सलीम ऊर्फ टेन्शन शेख उमर कुरेशी, झियाऊद्दीन गयासुद्दीन काझी, शेख इब्राहिम शेख हमीद कुरेशी, शेख नाजीम शेख युनूस, शोएब सलीम कुरेशी, रईस रज्जाक कुरेशी (सर्व रा. सानेगुरुजी वसाहत, चोपडा) व इतर १० ते १५ लोकांनी सदर ठिकाणी गैरकायद्याची मंडळी जमवून हल्ला चढवून काठीने व फायटरने मारहाण केली.

सहाय्यक निरीक्षक अजित सावळे यांच्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच जणांना अटक करण्यात आली आहे. दोन जण पसार झाले आहेत. निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक घनश्याम तांबे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत कोट्यवधींचं घर विकलं अन् घेतली बाईक! कारण काय? स्टार्टअप फाउंडरने सांगितली धक्कादायक निर्णयामागची कहाणी

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : पुण्यातील नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

SCROLL FOR NEXT