जळगाव

Jalgaon Crime : संशयिताला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (ता. १) रात्री घडली.

हल्ल्यात पोलिस कर्मचारी जखमी झाला असून, या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Attack on police went to arrest suspect jalgaon crime news)

पोलिस हा फैजपूर हद्दीतील महेंद्र ढाबा येथे येत असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली असता पथकास तत्काळ दालनात बोलावून संशयितास ताब्यात घेण्याबाबत सूचना देऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्यावरून पथक घटनास्थळी रवाना झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मिळालेल्या माहितीची खात्री केली असता संशयित आल्याचे निष्पन्न झाले. त्या वेळी महेंद्र ढाब्याजवळ रोडवर सापळा रचून ताब्यात घेत असताना पोलिस कर्मचारी प्रशांत सोनार यास शुक्रवारी (ता.१) रात्री सव्वाबाराच्या सुमारास निखिल राजपूत याने फायटरने उजव्या डोळ्याखाली मारून धक्काबुक्की केली.

तसेच हल्ला करून कारमधून पळून गेले. फैजपूर पोलिस ठाण्यात प्रशांत सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित निखिल राजपूत,अनिषा उर्फे मोही रितेश रतनानी सोबत तीन अनोळखी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक लोखंडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

SCROLL FOR NEXT