The door of Anil Ingle's shop in Sarafa Bazar was broken in this way.  
जळगाव

Jalgaon Crime News: शहरातील सराफाबाजार चोरट्यांच्या ‘रडार’वर! सेंसर सायरने वाचले 37 लाखांचे सोने

सराफ कारागिराच्या घरावर दरोड्याचा प्रयत्न झाला. दाराचा कडीकोयंडा तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : सराफ कारागिराच्या घरावर दरोड्याचा प्रयत्न झाला. दाराचा कडीकोयंडा तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र, दाराला बसविलेले सायरन वाजल्यामुळे मालकासह परिसरातील नागरिक जागे झाल्याने कामासाठी आणलेले सुमारे ३७ लाख रुपये किंमतीचे ६०० ग्रॅम सोने सुरक्षित राहिले आहे.

शनिवारी पहाटे साडेतीन वाजता मारवाडी व्यायामशाळेजवळ घडलेली हि घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. साधारण दीड- दोन महिन्यापूर्वी जळगाव सराफ बाजारात मोठी चोरी झाल्याची घटना ताजीच असताना अगदी तशाच पद्धतीने ही घटना घडल्याने व्यावसायिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. (Attempted robbery at Saraf craftsman house Jalgaon Crime News )

असा घडला प्रकार

शहरातील सराफ बाजार परिसरातील मारवाडी व्यायामशाळेजवळ अनिल इंगळे यांचे पद्मावती गोल्ड नावाचे सोने चांदीचे दागिने तयार घडविण्याचे दुकान आहे. शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास काळ्या रंगाचे कपडे आणि डोक्यात टोपी घातलेले चार चोरटे त्यांच्या घराजवळ आले.

त्यांनी घराच्या बाहेरील बाजूला लावलेली लोखंडी अँगल तीक्ष्ण कटरद्वारे कापले. त्यानंतर घराचा मुख्य दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजाला लावलेले सायरन अचानक वाजल्याने मोठ्या आवाजामुळे घरात झोपलेल्या इंगळे यांच्यासह परिसरातील नागरिकांना जाग आली. सायरनचा आवाज होताच परिसरातील रहिवासी नागरिक जागे झाले. तर, संकटाची चाहुल लागताच चोरट्यांनी तेथून धुम ठोकली.

प्रोफेश्‍नल चोरट्यांची टोळी!

चोरीच्या दुचाकीवर आले चोरट्यांनी सराफ बाजारातील दुकान फोडण्यापुर्वी कानळदारोडवरील आर.वाय. पार्क परिसरातून दुचाकी चोरली. त्या दुचाकीवरुन ते चोरीसाठी आले होते. दार तोडल्यावर काम फत्ते होणार इतक्यात दरवाज्यावरील सेन्सर सायरन वाजल्यामुळे चोरट्यांची गोची झाली अन्‌ दुचाकी सोडून पळून जावे लागले.

पोलिसांनी ही दुचाकी जप्त केली आहे, चोरट्यांनी चोरीच्या साहित्यासह त्यांनी धारदार शस्त्रेदेखील सोबत आणले होते. हा संपूर्ण प्रकार त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शनिपेठ पोलिस ठाण्यासह गुन्हेशाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

वारंवार सराफ बाजाराच टार्गेट

एक वर्षापूर्वी ९ नोव्हेंबरला मनीष ज्वेलर्स हे दुकान फोडून चोरट्यांनी अडीच लाखांचे सोने लुटले होते. तर, साधारण एक- दीड महिन्यांपूर्वीच सराफ बाजारातील किशोर वर्मा यांच्या संभव ज्वेलर्स हे दुकान फोडून सुमारे ११ लाखांचे सोने चोरुन नेले होते. या गुन्ह्याचा तपास लागत नाही तोवर शनिवारी पद्मावती गोल्ड या अनिल इंगळेंच्या फर्मवर दरोड्याचा प्रयत्न झाल्याने सराफ बाजारच चोरट्यांच्या टार्गेटवर आले आहे.एकाच चोरीत दहा-वीस लाखांचा माल मिळत असल्याने चोरीच्या दुचाकींवर येवुन सराफ बाजारातील एखादे दुकान फोडू असाच चोरट्यांचा प्रयत्न असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT