jalgaon municipal corporation esakal
जळगाव

जळगाव महापालिका आयुक्तांकडून रस्त्यावर कर्मचाऱ्यांची हजेरी; 4 निलंबित

महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी आता शहरातील साफसफाईच्या पाहणीकडे मोर्चा वळविला आहे.

सकाळ वृत्तसेवा


जळगाव : महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी आता शहरातील साफसफाईच्या पाहणीकडे मोर्चा वळविला आहे. सकाळीच त्या रस्त्याची पाहणी करीत आहेत. कामावर हजर नसलेल्या चार सफाई कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर एका आरोग्य निरीक्षकास ‘कारणे दाखवा’ नोटीस त्यांनी तत्काळ बजावली आहे.

महापालिका आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर महापौर विद्या गायकवाड यांनी सतरा मजली प्रशासकीय इमारतीच्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावली होती. आता त्यांनी प्रभाग समितीकडे लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील रस्त्याची साफसफाई होत आहे की नाही, याची पाहणी त्या सकाळीच अचानक अनेक भागात जाऊन करीत आहेत. यात कर्मचारी कामावर न आढळल्यास त्याच्यावर तत्काळ त्या कारवाई करीत आहेत. आज त्यांनी प्रभाग क्रमांक दोनमध्ये पाहणी केली, बजरंग बोगदा तसेच परिसरात त्यांनी साफसफाईची सकाळी पाहणी केली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली, यात सलमान शेख सलीम भिस्ती, अनिल किसन भेंढवाल, कन्हैया राजेंद्र चव्हाण, अनिता अनिल ढंढोरे हे चार कर्मचारी गैरहजर आढळले. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, अशी माहिती महापालिकेच्या आस्थापना विभागातर्फे देण्यात आली. यात आरोग्य निरीक्षक नंदू साळुंखे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT