Department of Social Justice esakal
जळगाव

Jalgaon News : ‘सामाजीक न्याय’तर्फे यंदा विविध पुरस्कारांचे वितरण; अर्ज सादर करण्याची १५ ऑगस्टपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे २०१९-२० ते २०२२-२३ पर्यंतचे पुरस्कार यंदा देण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (awards will be given from 2019 20 to 2022 23 by Department of Social Justice and Special Assistance jalgaon news)

यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू-फुले-आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार आदींचा समावेश आहे.

यापूर्वी ज्यांनी २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ च्या पुरस्कारांसाठी अर्ज केला आहे, त्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. ज्या वर्षाकरीता अर्ज केला असेल, त्या वर्षाकरीताचा चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करावा.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ज्या वर्षासाठी व ज्या पुरस्कारासाठी अर्ज करण्यात येत आहे, त्यासंदर्भातील विहीत अटींची पूर्तता करणे आवश्यक राहील.

समाजकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इच्छुकांनी या पुरस्कारासाठी कागदपत्रांसह आपले अर्ज १५ ऑगस्टपर्यंत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.

या विविध पुरस्कारांची जाहिरात व अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT