MP Unmesh Patil esakal
जळगाव

Jalgaon: 2 लाख दिव्यातून साकारणार राम मंदिराची 'मोजेक पेंटींग'! चाळीसगावात कथेप्रसंगी प्रतिकृतीचे होणार ‘वर्ल्ड रेकॉर्ड'

कार्यक्रमस्थळी आज पाहणीप्रसंगी खासदार पाटील, संपदा पाटील यांच्या हस्ते या पवित्र दिवे पेंटिंग कामाचा शुभारंभ करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : खासदार उन्मेष पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथा सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. मालेगाव रस्त्यावरील सुमारे ४० एकरात प्रभू श्रीराम व मंदिराचे दोन लाख दिव्यांमधून ‘मोजेक पेंटींग’ची प्रतिकृती साकारली जाणार आहे.

ही चित्रकृती जागतिक रेकॉर्ड करणार असल्याची माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी दिली. (ayodhya Ram mandir will made from 2 lakh lamps replica of temple will world record on occasion of story in Chalisgaon Jalgaon News)

कार्यक्रमस्थळी आज पाहणीप्रसंगी खासदार पाटील, संपदा पाटील यांच्या हस्ते या पवित्र दिवे पेंटिंग कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी विधानसभा निवडणूक प्रमुख नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक प्रकाश पवार, उद्योजक पद्माकर पाटील, नरेंद्र जैन, कलाकार चेतन राऊत, वास्तूविशारद आशुतोष खैरनार यांच्यासह पदाधिकारी, स्वयंसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार पाटील यांनी सांगितले, की २२ जानेवारीला श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने चाळीसगावकर व परिसरातील भाविक भक्तांना या प्रभू श्रीराम व मंदिर प्रतिकृतीचे दर्शन व्हावे, या उद्देशाने दोन लाख दिव्यांच्या माध्यमातून राम मंदिर व श्रीरामाची कलाकृती सादर केली जाईल.

आजपर्यंत देशात एक लाख ८० हजार दिव्यातून अशी प्रतिकृती साकारल्याचे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ होते. चाळीसगाव येथील कलाकृतीतून दोन लाख दिव्यांचे सुमारे १०० बाय ८० फूट रुंदीची नवीन चित्रकृती सादर करण्यात येणार असून ही कलाकृती जागतिक विक्रम प्रस्थापित करणार आहे.

त्यासाठी ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ व्यवस्थापन समितीला आमंत्रित करण्यात आले आहे. मुंबईचे कलाकार चेतन राऊत व त्यांचे दहा सहकारी तसेच ४० महिला या दिव्यांच्या रंगकाम मोजणी व मांडणीसाठी मदत करत असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले.

आज ध्वजारोहण

प्रभू श्रीराम महाशिवपुराण कथेच्या कार्यक्रम स्थळावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम शुक्रवारी (ता. १२) दुपारी एक वाजता होईल.

तालुका व परिसरातील साधू, संत, महंत, पुरोहित व ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत ध्वजपूजन केले जाणार असून यावेळी परमपूज्य महामंडलेश्वर १००८ ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडीकर, खासदार पाटील, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ऋषिपांथा येथील धनंजय महाराज, वडगाव लांबे वटेश्वर आश्रमाचे रविदासजी महाराज,

भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, पोलिस उपविभागीय अधिकारी अभयसिंह देशमुख, प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलिस निरीक्षक संदीप पाटील, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खलिस्तानी पन्नूची दिलजीत दोसांजला धमकी; बिग बींच 'या' वादाशी काय आहे कनेक्शन?

पतीला प्रेयसीसह रंगेहात पकडलं, संतापलेल्या बायकोनं रस्त्यावरच चपलांनी हाणलं, प्रेयसी लॉजमधून पसार; VIDEO तुफान व्हायरल

सात महिन्यांनी आला, ऑस्ट्रेलिया दौरा गाजवला अन् रोहित शर्मा जगात भारी ठरला... ICC ची मोठी घोषणा, शुभमन गिलला केलं रिप्लेस

हॉटेलचं बिल पाहून गुजराती पर्यटकांनी पळ काढला, गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली अन् फजिती झाली Video Viral

IIT Admission Without JEE: आनंदाची बातमी! आता जेईईशिवाय प्रवेश मिळणार 'या' IIT मध्ये, जाणून घ्या कसे

SCROLL FOR NEXT