A team of the city police station inspecting a car after its window was broken and stolen  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : दिवसा कार फोडून बॅग चोरीचे सत्र; लाखांचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील चित्रा चौकात सोमवारी (ता. १७) दुपारी एकच्या सुमारास जेवणासाठी आलेल्या व्यापाऱ्यांच्या कारची काच फोडून बॅग चोरून नेली. (bag was stolen by breaking window of businessman car jalgaon crime news)

यापाठोपाठ मणियार सुपरशॉपमधून कारची काच फोडून ७५ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटनाही घडली. भरदुपारी एकामागून एक अशा या दोन घटना घडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

चित्रा चौकात फोडली कार

शिरपूर येथील फर्टिलायझर विक्रेते जितेंद्र शालिग्राम भदाणे त्यांच्या मित्रासह जळगावमार्गे कार (एमएच १८, बीसी ०२५७) ने जामनेर जाण्यासाठी निघाले होते. दुपारी बारा वाजून ४० मिनिटांनी चित्रा चौकातील खत विक्रेत्यांच्या दुकानाबाहेर कार उभी केली आणि जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले. दोघे जेवण करून सव्वाला परत आले असता, त्यांना मागील दरवाजाची काच फुटलेली आढळून आली.

कारमध्ये डोकावून पहिले असता, मागील सीटवर ठेवलेली बॅग त्यांना दिसून आली नाही. दोघांनी तत्काळ शहर पोलिसांना माहिती दिली. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करून माहिती घेतली. बॅगमध्ये दहा हजारांची रोकड आणि महत्त्वाचे दस्तऐवज होते. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. गुन्हे शोध पथकातील कर्मचारी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलन करीत असून, चोरट्याचा शोध सुरू असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

मणियार सुपरशॉपसमोरून ७५ हजार लंपास

दुसऱ्या घटनेत नंदगाव (ता. जळगाव) येथील शेतकरी अमोल कारभारी पाटील (वय २७) त्यांची बहीण भाग्यश्री मोरे यांच्या हॉस्पिटलच्या कामासाठी जळगावला आले होते. बहिणीचे सासू-सासरे पारोळ्याहून आले, त्यांना स्वीफ्ट कारने (एमएच ४८, पी ९७१०) घेऊन ते जात असताना, ड्रायफ्रूट घेण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील मणियार सुपरशॉपजवळील ज्यूसच्या गाडीजवळ कार लावली.

दुपारी एक वाजून ४० मिनिटांनी ते कारजवळ परत आले असता, बहिणीची सासू संगीताबाई पाटील यांना कारच्या डाव्या बाजूकडील मागील काच फुटलेली दिसली. आत तपासले असता, मागील सीटवरील दोन्ही बॅगा आढळून आल्या नाहीत.

त्या बॅगांमध्ये आठ हजार रुपयांचा मोबाईल, ५०० व १०० च्या नोटा, अशी ४२ हजारांची रोकड व सोन्याची अंगठी, असा जवळपास ७५ हजारांचा ऐवज होता. अमोल पाटील यांनी तातडीने जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा नोंदविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT