जळगाव

जळगावची केळी जाणार पाकिस्तानात 

दिपक चौधरी

जळगाव ः महाराष्ट्रासह संपूर्ण देशात जळगावची केळी प्रसिद्ध आहे. लहान गावांमधली केळी आता मेट्रो सिटीजमध्ये निर्यात होऊ लागली आहे. मोठ्या शहरांमध्येही जळगाव जिल्ह्यातील दर्जेदार केळीला मागणीही वाढू लागणी आहे. देशांतर्गत केळीची मागणी पाहता केळी फळपिकाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे. यात इराण, इराक, अफगाणिस्तान, दुबई, अझरबैजान कुवैत आदी देशांत जळगावची केळी ही निर्यात होते आहे. इतर देशांतील मागणी पाहता पाकिस्तानी बाजारपेठांमधूनही जळगावच्या केळीला मागणी येत आहे.

त्यामुळे जळगावातील रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या केळीला पाकिस्तानात निर्यात करण्याबाबत खासदार रक्षा खडसे यांनी कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना निवेदन दिले आहे. याबाबत तोमर यांच्याशी सकारात्मक चर्चा केली आहे. 

जळगावच्या केळीचा लोकप्रियता

जळगावच्या केळीची लोकप्रियता हळूहळू संपूर्ण देशात वाढू लागलेली आहे. त्यामुळे देशांतर्गत केळीची मागणीही आता वाढू लागलेली आहे. भारत व पाकिस्तान देशातील तणावामुळे पाकिस्तानसोबत व्यापाराला कमी प्राधान्य दिले जात होते. परंतु भारत पाकिस्तानच्या व्यापाराचे व्यवहार आता पूर्ववत होत असून भारतातून कापूस आणि इतर शेतकी उत्पादन सुरळीत निर्यात होऊ लागले आहेत.

शेतकऱ्यांना मोठी संधी

अनुषंगाने केळी फळपीक पाकिस्तानात निर्यात करण्याबाबत कृषी मंत्र्यांनासोबत खासदारांनी सकारात्मक चर्चा केली. पाकिस्तानात केळी निर्यातीस मंजुरी मिळाल्यास बारामाही केळीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी संधी निर्माण होऊन पाकिस्तानसोबत व्यापाराचे संबंध दृढ होऊ शकतात. छोट्या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही केळी निर्यातीच्या माध्यमातून अनेक संधी निर्माण होणार आहेत. तसेच तरुणांनाही रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होऊन मजुरांना आर्थिक बाळकटीही मिळू शकणार आहे.

दूतावासाकडून सकारत्मकता

केळी फळपिक लवकरच पाकिस्तानात निर्यात होण्यासाठी कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सकारात्मकता दर्शविलेली आहे. त्यामुळे जळगावची केळी ही पाकिस्तानात निर्यात होण्यासाठी भारतीय दूतावासाने सकारात्मकता दर्शवून जळगाव जिल्ह्यातील केळी फळपीक पाकिस्तानात निर्यातीबाबत सकारात्मकता दर्शवावी असे खासदार रक्षा खडसे यांनी कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना पत्राच्या माध्यमातून निवेदन दिले आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गौतम गंभीरचे Rohit Sharma, विराट कोहली यांच्या भविष्याबाबत मोठं विधान! मोजक्या शब्दात बरंच काही बोलून गेला, चाहत्यांची वाढली चिंता

सरन्यायाधीशांसमोर हजर करण्याचा बनाव, डिजिटल अरेस्ट करत नाशिकमध्ये २ वृद्धांची ७ कोटींची फसवणूक

Kolhapur Crime : १२ कोटी ३५ लाखांची फसवणूक! बाळूमामांच्या दरबारात पाया पडायला आला अन्, पोलिसांच्या सापळ्यात बरोबर अडकला...

सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटलं, निवेदनात काय केल्यात मागण्या? मोठी माहिती समोर

Mumbai News: मुंबईकरांना दिवाळी भेट; कागदपत्र नोंदणीसाठी क्षेत्र सीमा नियम सरकारने रद्द केला

SCROLL FOR NEXT