Leaders of all parties at the start of the season by 'Baramati Agro Unit 4'. esakal
जळगाव

Jalgaon News: ‘बारामती ॲग्रो’ करणार 3.5 लाख टन गाळप; 25 हजार एकर उसाची नोंद

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यातील चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना ‘बारामती ॲग्रो लिमिटेड युनिट ४’ने भाडेतत्त्वावर घेतल्यानंतर तिसरा गाळप हंगामाचा शुभारंभ बॉयलर अग्नि प्रदिपन २१ ऑक्टोबरला विधानसभा माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले होते तर गुरुवारी (ता. २) सकाळी दहाला सर्वपक्षीय नेत्यांच्या हस्ते तिसरा गळीत हंगामास मोळी टाकून सुरुवात करण्यात आली.

या वेळी मोळी पूजन विधानसभा माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, माजी आमदार कैलास पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, चोसाका अध्यक्ष चंद्रहास गुजराथी, उपाध्यक्ष एस. बी. पाटील, माजी अध्यक्ष ॲड. घनश्याम पाटील, अतुल ठाकरे, जनरल मॅनेजर मिलिंद देशमुख आदींच्या हस्ते करण्यात आले. (Baramati Agro will produce 3.5 lakh tonnes of silage jalgaon news)

बारामती ॲग्रोचे हे तिसरे गाळप असून, यावेळेस शेतकऱ्यांना कसलाही त्रास होणार नाही, याची काळजी बारामती ॲग्रो घेणार आहे. तालुक्यासह इतर भागात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने इतर कारखाने जो भाव देतील तोच भाव बारामती ॲग्रोकडून मिळणार आहे. आतापर्यंत शिरपूर, चोपडा, भडगाव, यावल, धरणगाव, अमळनेर या परिसरातील एकूण २५ हजार एकर उसाची नोंद बारामती ॲग्रोकडे करण्यात आली आहे.

यावर्षी तीन ते साडेतीन लाख टन गाळपाचे उद्दिष्ट बारामती ॲग्रोने ठेवले आहे. मार्च ते एप्रिल एंडपर्यंत कारखाना सुरू राहील. रिकव्हरी चांगली मिळाल्यास शेतकऱ्यांच्या उसाला दरही चांगला मिळेल. शेतकऱ्यांनी बारामती ॲग्रोच्या प्रोग्रामनुसारच ऊसतोड होईल ते सहकार्य शेतकऱ्यांनी करावे, असे आवाहन बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी ऊसतोडसाठी कुठलीही घाई गर्दी करू नये. ऊस परिपक्व झाल्याशिवाय रिकव्हरी मिळत नाही.

आणि रिकव्हरी असल्याशिवाय आपणास दर देता येत नाही. त्यामुळे कुणाचाही ऊस शेतकऱ्यांच्या शेतात उभा राहणार नाही, याची काळजी बारामती ॲग्री घेईल. परंतु शेतकऱ्यांनी ऊस घालविण्यासाठी प्रोग्रामचेच पालन करावे, आमच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. उसाच्या चांगल्या जातीच्या रोपांची लागवड करावी, चांगल्या प्रतीचे रोप बारामती ॲग्रोकडे आहेत.

कारखान्याच्या योजनांचा लाभ शेतकऱ्याने घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. कारखान्यात नवतंत्रज्ञानाचा वापर अत्याधुनिक सुविधा केल्या आहेत. यामुळे कारखाना एक दिवसही न बंद होता संपूर्ण दिवस सुरू राहील. ऑटोमॅटिक सिस्टिमद्वारे बॅगिंग होईल. कारखान्याची यंत्रसामग्री पूर्ण क्षमतेने चालू राहील.

ट्रक ट्रॅक्टर जुगाड, हार्वेस्टर, बैलगाडी यासह यंत्रणा सज्ज असून, या यंत्रणेमार्फत साधारणता सात ते आठ हजार टन ऊसतोड करू शकतो. बारामती ॲग्रोचे पूर्णपणे गाळपासाठी नियोजन केले आहे. तरी सर्व शेतकरी सभासद उत्पादक बंधूंनी बारामती ॲग्रोला सहकार्य करावे, असे आवाहन उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी केले आहे.

या वेळी संचालक दिनकर देशमुख, अनिल पाटील, गोपाळ पाटील, शशिकांत देवरे, गोपाळ धनगर, शिवाजी पाटील, डी. पी. साळुंखे, डॉ. चंद्रकांत बारेला, ज्ञानेश्वर रायसिंग, तुकाराम पाटील, शशिकांत साळुंखे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : सूर्यकुमार यादवसाठी दरवाजे अजूनही खुले... माजी कर्णधाराचे टीम इंडियात पुनरागमन शक्य... जाणून घ्या, कसं!

RBI News: WhatsApp वर RBI चा मेसेज आला? खिशातील रुपया आता मोबाईलमध्ये! डिजिटल रुपया म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय पेरांबूरला भेट देत आहेत

IND vs ENG: 'Lords' वर देव! भारतीय महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर Video

Devkund News: देवकुंड डोहात बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह 50 फूट खोल डोहात सापडले; अवघ्या पंधरा मिनिटात रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

SCROLL FOR NEXT