Abhijit Raut esakal
जळगाव

जळगाव : बोगस बियाण्यांबाबत सतर्क रहा - जिल्हाधिकारी राऊत

बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी दिल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात बोगस बियाणे येता कामा नये आणि आलेच तर शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होईल. बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचा शोध घ्या. सतर्क राहून बोगस बियाण्याची विक्री होवू देवू नका. विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या आहेत.


आज जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीची सभा झाली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या सुचना दिल्या.
जिल्हाधिकारी राऊत यांनी कंपनी प्रतिनिधींना बियाण्यांचा पुरवठा वेळेत करण्यास सांगून शेतकऱ्यांनी मिश्रखत घरी तयार करण्याचा सल्ला दिला. यावेळी बियाणे खते किटक नाशके खरेदी करताना घ्यायची काळजी व जीवाणू खते वापर व फायदे याबाबत बॅनरचे अनावरण जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यातील उपलब्ध खत साठा सहज समजावा यासाठी तालुकानिहाय ब्लॉगस्पॉट उपलब्ध करून दिला आहे. त्याचे अनावरण करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषेदेच कृषि विकास अधिकारी वैभव शिंदे, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, मोहिम अधिकारी विजय पवार, खते बियाणे किटकनाशके विक्रेते कंपनी जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT