Party leader Girish Mahajan inspecting the venue at Sagar Park esakal
जळगाव

Amit Shah Jalgaon Daura : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुवारी जळगावात

भारतीय जनता पक्षाचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुवारी (ता. १५) जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुवारी (ता. १५) जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत युवा संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्यांचा दौरा यशस्वी करावा, असे आवाहन राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. तसेच आज त्यांनी मेळावा स्थळाची पाहणीही केली.

अमित शहा यांच्या उपस्थितीत जळगाव येथे सागर पार्क मैदानावर युवा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. (Bharatiya Janata Party leader and Union Home Minister Amit Shah is coming on visit to Jalgaon district news)

स्थळाची पाहणी मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण आदींनी केली. या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

‘वसंत स्मृती’त पदाधिकारी बैठक

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्ताने आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

या वेळी गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, खासदार उन्मेष पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर जळकेकर महाराज, महानगराध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे आदी उपस्थित होते.

या वेळी महाजन म्हणाले, की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रथमच जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. गुरुवारी (ता. १५) युवा संमेलन सागर पार्क मैदानावर आयोजित करण्यात आले आहे.

त्यामुळे जिल्हाभरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी. जळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. मोठ्या प्रमाणात उपस्थितीच्या माध्यमातून पक्षाची असलेली ताकद दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

या वेळी आमदार भोळे यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Elections 2025: मोठी बातमी! बिहार विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त ठरला?

Pune Ward Structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; राजकीय सोय बघून प्रभागांमध्ये बदल?

Uddhav Thackeray : संघटनात्मक बांधणी भक्कम केल्याशिवाय ते जिंकले कसे, आपण हरलो कसे याची उत्तरे मिळणार नाहीत : उद्धव ठाकरे

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT