BHR Scam
BHR Scam esakal
जळगाव

BHR Case : अवसायक जितेंद्र कंडारेला सर्वोच्च दिलासा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्यासह संपूर्ण देशभर चर्चेत असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) को-ऑपरेटीव्ह संस्थेच्या अपहार प्रकरणी तत्कालीन अवसायक संशयित जितेंद्र गुलाबराव कंडारे याला सर्वोच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी खंडपीठाने त्याचा जामीन नाकारला होता. (BHR case suspect Jitendra Kandare was granted bail by Supreme Court today jalgaon news)

मल्टीस्टेट कार्यक्षेत्र असलेल्या बीएचआर या पतसंस्थेचा व्याप देशभरातील ७ राज्यांमध्ये २५० पेक्षा जास्त शाखा विस्तारलेल्या आहे. याच पतसंस्थेत संचालक मंडळाच्या नियमबाह्य आणि अनियमित व्यवहारांमुळे सुमारे १२०० कोटींचा अपहार-घोटाळ्याचे प्रकरण उजेडात आले होते.

परिणामी राज्य शासनाने ठेवीदारांच्या ठेवींची रक्कम परत मिळावी म्हणून पतसंस्था अवसायनात काढण्यात आल्यानंतर (नोव्हेंबर २०१५) तत्कालीन राज्य शासनाने जितेंद्र गुलाबराव कंडारे याची अवसायक म्हणून नियुक्ती केली होती.

पतसंस्थेतर्फे वाटप कर्जाची वसुली करून जवळपास ८०० कोटींच्या ठेवींची रक्कम संस्थेला परत करावयाची असल्याने जप्त केलेल्या कर्जदारांच्या मालमत्ता लिलाव प्रक्रिया राबवून त्यातून येणाऱ्या सुमारे १२०० कोटी रुपयांच्या उत्पन्नातून पतसंस्थेला अवसायनातून बाहेर काढणे अपेक्षित होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मात्र, घडले ते विपरीतच अवसायक कंडारे याने त्याच्या साथीदारांशी संगनमत करून ठेव पावत्यांचे बेकायदा संकलन आणि मॅचिंगसह गैरव्यवहाराचे आरोप त्याच्यावर लावण्यात आले होते.

अटक होऊन सुटका झालेले मातब्बर

पुण्याच्या डेक्कन (२४ नोहेंबर २०२०) व शिक्रापूर पोलिस ठाण्यासह इतरत्र फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या तपास पथकाने या गुन्ह्यात प्रकाश जगन्नाथ वाणी, सुनील देवकीनंदन झंवर,(रा. सुहास कॉलनी, जळगाव), महावीर माणिकचंद जैन,

अजय नंदलाल राठी, आदिनाथ निवास कोटवळ (टिळकवाडी, नाशिक), विवेक देवीदास ठाकरे (रा.महाबळ कॉलनी, जळगाव), अजय ललवाणी, उदय कांकरिया, धरम सांखला यांना टप्प्याटप्प्याने अटक केली होती. तपासातील जबाबदारी निश्चित होऊन न्यायालयीन कोठडीत गेल्यावर एका पाठोपाठ एक जामीन मिळत संशयित बाहेर आले.

कंडारेची मुक्तता

जितेंद्र गुलाबराव कंडारे यांच्याविरोधात व इतर आरोपींविरोधात पुरावा दाखल झाल्याने त्यांच्याविरोधात २२ मार्च २०२२ ला दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी इंदूर येथून जितेंद्र कंडारे याला अटक जून-२०२१ मध्ये केली होती.

शिक्रापूर येथील गुन्ह्यात जामिनासाठी कंडारे याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर कामकाज झाले असता त्याला जामीन मंजूर करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कंडारे बाहेर पडल्यावर आता बीएचआर प्रकरणात कोणता नवा ट्विस्ट येतो यांची उत्कंठा जळगावकरांसह ठेवीदारांना लागून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT