esakal
esakal
जळगाव

Positive News : अरे व्वा.. अखेर मोबाईल सापडला... पोलिसांची अशीही सकारात्मकता!

सकाळ वृत्तसेवा

Positive News : गर्दीच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक स्थळी चोरीस गेलेली वस्तू लवकर (Jalgaon News) गवसणे कठिण. त्यातही लहान वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक गॅझेट मिळणे दुर्मिळच. मात्र, तत्परतेने सादर केलेली संबंधित कागदपत्रे व पोलिसांनी त्यासाठी केलेला प्रामाणिक पाठपुरावा हा आनंदाची फलश्रुती देऊन जातो. याची प्रचिती नुकतीच रेल्वे अर्थात लोहमार्ग पोलीसांनी घडविली. (bhusawal lohmarg police found stolen mobile phone and return to owner jalgaon news)

याबाबत परितोष नवाल यांनी त्यांना आलेला अनुभव शेअर केलाय.. १४ डिसेंबर २०२२ ला माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे तब्बल तीन वर्षांनंतर प्रथमच जळगावात आगमन झाले. जळगाव रेल्वे स्थानकावर गर्दीत चोरट्यांनी व्यवस्थितपणे हात साफ करुन घेतले. अनेकांचे मोबाईल, ब्रासलेट, पाकीट, घड्याळ, तसेच रोकडीही चोरीला गेले.

यात आमचेही दोन महागडे मोबाईल चोरीस गेले. दुसऱ्या दिवशी जळगाव लोहमार्ग पोलीस चौकीत तक्रार नोंदवायला गेलो असता लोहमार्गचे पोलीस अधिकारी समाधान कंखरे व त्यांचे सहकारी हे दोघे रात्रपाळीची ड्युटी संपूनसुद्धा सकाळी उशिरापर्यंत थांबून फिर्याद नोंद करुन घेत होते. त्यांनी आमचीही तक्रार नोंदवून घेतली.

तसेच, भुसावळ येथे एफआयआर आणि त्यानंतर हरवलेले मोबाईल सर्वेलंसला टाकण्यात येतील. त्यासाठी दोन ते तीन दिवस लागतील, असे सांगून सर्व प्रक्रिया पूर्ण झाली.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

त्यानंतर दहा ते पंधरा दिवसांपर्यंत आम्ही पाठपुरावा केला. पण काहीही हाती लागत नव्हते. अखेर आम्ही आशा सोडली. अचानक अडीच महिन्यांनंतर लोहमार्ग पोलीसांकडून फोन आला की, तुमचे दोनपैकी एक मोबाईल सापडला आहे. त्यासाठी तुम्हाला भुसावळ रेल्वे कोर्टात जावे लागेल. कोर्टात जाताना मोबाईल बिल, फिर्यादीची व एफआयआरची प्रत, आधार कार्ड घेऊन जा.

सर्व कागदपत्रे घेऊन आम्ही भुसावळ रेल्वे कोर्टात गेलो. तिथे अ‍ॅड. आर. एम. यादव व त्यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. त्यानुसार त्याची पूर्तता केली. तीन तारखांनंतर मोबाईल मिळण्याची कोर्टाची ऑर्डर निघाली. स्टॅम्प पेपरवर खुलासा सादर करुन कागदपत्रांची पूर्तता केली अन् अखेर मोबाईल मिळाला. तेही अगदी सुस्थितीत..

प्रामाणिकपणा व सकारात्मकता

भुसावळ लोहमार्ग पोलीस स्टेशनला रेल्वे कोर्टाची ऑर्डर देताच दाहा मिनिटांत सर्व प्रक्रिया पूर्ण करुन मोबाईल मिळाला होता. त्यासाठी कोणतीही आर्थिक तोशिष लागली नाही. हरवलेल्या दुसऱ्या मोबाईलसाठीही आम्ही प्रयत्नरत असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले, हे विशेष. या संपूर्ण प्रकरणी भुसावळ लोहमार्गचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्यासह हेड कॉन्स्टेबल अजित तडवी, जगदिश ठाकूर, धनराज लुले, सागर खंडारे, दिवासिंग राजपुत व सतीश जंजाळ यांनी सहकार्य केले. आजही समाजात अशा प्रामाणिक लोकांमुळे सकारात्मक अनुभव येत असतात, अशी भावना परितोष यांनी बोलून दाखवली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमित शाहांच्या पंतप्रधानपदाची तारीख सांगितली पण मालीवाल यांचा प्रश्न आल्यावर मात्र... केजरीवालांच्या मदतीला धावले अखिलेश

SRH vs GT : हैदराबादला प्ले-ऑफचे तिकीट की गुजरात शेवटच्या लढतीत घालणार विजयाला गवसणी... कोण पडणार कोणावर भारी?

Sharad Pawar: बारामतीच्या मतदानानंतर अजित पवार प्रचारातून गायब? शरद पवारांनी व्यक्त केली काळजी

Latest Marathi News Live Update : मुंबई- अहमदाबाद मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Swati Maliwal News : दिल्लीच्या राजकारणात भूकंप! कुठे आहेत स्वाती मालीवाल? मारहाणीच्या मुद्द्यावरुन भाजपने 'आप'ला घेरलं

SCROLL FOR NEXT