Aarrested  esakal
जळगाव

Jalgaon News : भुसावळची लूट करणारी टोळी अटकेत; गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : भुसावळसह जिल्ह्यात विविध ठिकाणी चोरी व लूट करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अटकेतील चौघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जळगाव शहरासह जिल्ह्यात चोरी, घरफोड्यांसह जबरी लूटीचे प्रकार वाढले आहेत. पोलिस अधीक्षक एस. जयकुमार यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या चोऱ्यांचा स्वतंत्र तपास करत होते. (Bhusawal Thieves gang arrested Action of crime branch team Jalgaon Crime News)

हेही वाचा : ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

निरीक्षक किशन नजन पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरात उच्छाद मांडणाऱ्या टोळीवर गुन्हेशाखेने लक्ष केंद्रित केले होते. टोळीतील प्रमोद कैलास धिवरे (वय-२७, रा. कंडारी, भुसावळ), मयूर संजय अंभोरे (वय-२२, पंधरा बंगला भुसावळ), आकाश किशोर किरतकुरे (वय-२८, कंडारी), हितेंद्र ऊर्फ किट्टू राजू बोदला (वय-२४, रा. झेड. टी, हायस्कूल भुसावळ) अशा चौघांना अटक करण्यात आली आहे.

अटकेतील संशयितांकडून मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. संशयितांच्या टोळीने लूटीचे गुन्हे कबूल केले असून त्यांना अधिक तपासासाठी बाजारपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation : कॉकरोच जनता पार्टी निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार यांच्याविरोधात रस्त्यावर उतरणार; गांधी जयंतीला देशव्यापी आंदोलनाचा इशारा

Drought in Maharashtra : दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

२४ किलो वजन घटवलं! वनिता खरातने सांगितलं डाएटचं सीक्रेट; म्हणाली, ‘आज माझा चीट डे’

Maharashtra Ganesh Visarjan Live: मिरजेतील पहिल्या गणपतीचे विसर्जन; नदीवेस शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीसाठी गणेश तलावावर जय्यत तयारी

Soybean Crop: व्यथित शेतकऱ्याने पेटवून दिले सोयाबीनचे पीक

SCROLL FOR NEXT