Confusion erupted after the truck overturned at Akashvani Chowk.  
जळगाव

Jalgaon Accident News: सुसाट वेगातील ट्रक दिसताच राखले प्रसंगावधान; दुचाकी दाबली आणि कारचे नुकसान

भूज (गुजरात) येथून ट्रक (जीजे १२ बीवाय ६८२३) शौचालयाची भांडी घेऊन मध्य प्रदेशकडे जात होता.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : गुजरातच्या कच्छ-भूज येथून शौचालयाची भांडी घेऊन मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुसाट ट्रक आकाशवाणी चौक सर्कलवर आदळून उलटला. ट्रक उलटून त्याखाली दुचाकी दाबली गेली. समोरील उभ्या कारचे मोठे नुकसान झाले.

अपघातात ट्रकचालक जखमी झाला. कारमधील चौघांसह दबलेल्या दुचाकीवरील चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. जिल्‍हापेठ पोलिसांत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (bike car Stopped as soon as speeding truck was seen jalgaon news)

भूज (गुजरात) येथून ट्रक (जीजे १२ बीवाय ६८२३) शौचालयाची भांडी घेऊन मध्य प्रदेशकडे जात होता. रविवारी (ता.२४) रात्री दहाच्या सुमारास हा ट्रक जळगावकडून भुसावळच्या दिशेला जात असताना उड्डाणपुलावरून तो सरळ आकाशवाणी चौकाच्या दिशेने आला. पुलावरून उतरताना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने सुसाट ट्रक चौकातील सर्कलला धडकला.

काळजाचा ठोका चुकला

इथून पुढे येऊन पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या कारला धडक दिल्यावर पुढे जाऊन उलटताना एक दुचाकी त्यात दाबली गेली. दुचाकीचा चुराडा झाला. श्री. पवार वाहन थांबवून बाजूला गेले असताना कारमध्ये आनंद ठाकूर, नगरसेवक पी. डी. पाटील, दिनेश लोहार हे बसलेले होते. इतक्यात, हा काळजाचा ठोका चुकविणारा अपघात घडला. कारमधील कोणालाही दुखापत झाली नाही.

दुचाकीस्वाराला दुरून हा ट्रक हेलकावे घेत येत असल्याचे कळताच, त्याने दुचाकी सोडून पळ काढल्याने तो वाचला. श्री. पवार यांनी तत्काळ यंत्रणेला माहिती सांगून मदत मागवून घेतली. जिल्‍हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक डॉ. विशाल जैस्वाल हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. लगेच रुग्णवाहिका पोहोचली. चालकाला तातडीने उपचारासाठी जिल्‍हा रुग्णालयात हलविण्यात आले.

अन् दैव बलवत्तर...

अपघातापूर्वी उड्डाणपुलावरून येत असलेला ट्रक हेलकावे घेत येत असताना प्रत्यक्षदर्शींना अपघाताचा अंदाज आला होता. ट्रक सर्कलवर आदळण्यापूर्वी दुचाकीस्वाराने वाहन सोडून पळ काढल्याने वाचला. ट्रकखाली दुचाकी दाबली जाऊन तिचा चुराडा झाला. भीती आणि आरडाओरडीने आकाशवाणी चौकात काहीवेळ गोंधळाची स्थिती तयार झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला डावलून शुभमन गिलला संधी; मांजरेकर बसरले, 'हा अन्याय आहे...'

Viral: पतीने गर्भनिरोधक गोळी खरेदी केली, ऑनलाइन पैसे दिले, पण एक छोटी चूक अन् पत्नीसमोर अनैतिक संबंधाचे बिंग फुटले!

Latest Marathi News Updates : ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Shirur Crime : मेडिकल चालकाची डॉक्टरला शिवीगाळ करीत पट्ट्याने मारहाण; डॉक्टर जखमी

SCROLL FOR NEXT