accident  esakal
जळगाव

Jalgaon Accident News : रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; विदगाव फार्मसी कॉलेज जवळ अपघात

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : ममुराबाद ते विदगाव रोडवर सुसाट ॲपे रिक्षाने शनिवारी (ता. ७) रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीस्वारास जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर, रिक्षा उलटून चालक किरकोळ जखमी झाला आहे. (Bike rider killed in accident with rickshaw dhule news

विजय पंडीतराव कोळी (वय ४०, रा. पार्वतीबाई ओकनगर, चौगुले प्लॉट) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. ते कामानिमित्त विदगाव (ता. जळगाव) येथे गेले होते.

तेथून दुचाकी (एमएच १९, एवाय ७९०५)द्वारे जळगावकडे परतत असताना फार्मसी कॉलेजजवळील वळण रस्त्यावर समोरुन सुसाट वेगात येणाऱ्या ॲपे रिक्षा (एमएच १९, व्ही ३६४२)वरील चालकाने दुचाकीला समोरुन जोदार धडक दिली.

यात दुचाकीसह विजय कोळी रस्त्यावर फेकले गेले, तर रिक्षा रस्त्याच्या कडेला उलटली. डोक्याला मागील बाजुने गंभीर दुखापत झाल्याने कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच तालूका पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले.

तर, कांचनगर, जैनाबाद, चौगुले प्लाट भागातील तरुणांसह मृताचे नातेवाईक, कुटूंबीयांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत याबाबत तालूका पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT