Harishchandra Chakar 
जळगाव

Jalgaon Accident News: नीलगायच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : शहरातील साळशिंगी पुलाजवळ नीलगायच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, तर दोन जण जखमी झाले. ही घटना सकाळी आठच्या सुमारास बोदवड-भुसावळ रस्त्यावर घडली. ( Bike rider killed in Nilgai collision jalgaon news )

बोदवड-साळशिंगीदरम्यान पुलाजवळ हरिश्‍चंद्र किसन चाकर (रा. खडका) दुचाकीने (एमएच १९, डीएन ८८४७) सकाळी कामासाठी बोदवड येथे येत असताना नीलगायने (रोही) दुचाकीला धडक दिल्याने हरिश्‍चंद्र चाकर यांना डोक्यावर गंभीर मार बसला.

दरम्यान, त्याचवेळी प्रमोद नामदेव पाडर व रितीक मनोज पाटील हे दोघे बोदवडहून भुसावळकडे दुचाकीने (एमएच १९, ईएफ ४५८२) जात असताना समोरून हरिश्‍चंद्र यांची दुचाकी घसरत मोटारसायकलवर आदळल्याने पाडर व पाटीलही गंभीर जखमी झाले.

त्याना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत हरिश्‍चंद्र यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यांचे विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

मृत हरिश्‍चंद्र यांच्यामागे वृद्ध आई, चार वर्षांची मुलगी, सहा वर्षांचा मुलगा आहे. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी बोदवड पोलिसांत उखर्डू दलपत महाजन यांच्या खबरीवरून अपघाताची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT