Blood Donation
Blood Donation esakal
जळगाव

दिव्यांग बांधवांचे सामाजिक दायित्व; गणेश पाटील यांचे 50 वे रक्तदान

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासते. त्यामुळे सामाजिक जाणिवेतून केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या जळगाव तालुका शाखा, संघर्ष दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय संस्थेतर्फे मंगळवारी (ता. २४) रुग्णालयातील रक्तपेढीत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले. रक्तदान केलेल्यांना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. (Blood donation by Divyang in Jalgaon)

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ही बाब लक्षात संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयातील रक्तपेढीमध्ये रक्तदान केले. यावेळी एकूण सात रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या. डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. श्रीनिवास पाटील उपस्थित होते. रक्तपेढीतील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. दीपक पाटील, अधिपरिचारक तेजस नेमाडे, तंत्रज्ञ दीपक कुमार होनमाने, सौरभ राऊत, प्रभाकर पाटील आदींनी सहकार्य केले.

नेवे यांनी केले ६१ वे रक्तदान

मानवाधिकार संघटनेचे जळगाव तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांनी १२ वे, सदस्य जितेंद्र पाटील यांनी ३३ वे तर सदस्य किशोर नेवे यांनी ६१ वे रक्तदान केले. संघर्ष दिव्यांग कल्याण बहु. संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील यांनी ५० वे, सदस्य प्रवीण भोई यांनी १० वे, सदस्य दत्तात्रय महाजन यांनी पहिल्यांदा तर शहरी बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी यांनी रक्तदान केले. महाविद्यालयातील एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षांतील अंकिता ढमढेरे, जेनीटा जैसन, शेवटच्या वर्षातील ऋषिकेश स्वामी या विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT