Ganesh Sitaram Patil
Ganesh Sitaram Patil esakal
जळगाव

Jalgaon News : शिवमहापुराण कथेतून बेपत्ता प्रौढाचा मृतदेह सापडला

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : नागझिरी(ता.जळगाव) शिवारातील गिरणा नदीपात्रात गुरुवार (ता.१४) रोजी एका अज्ञात प्रौढाचा मृतदेह आढळून आला होता. तालुका पोलिसात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

शुक्रवार(ता. १५) रोजी मायताची ओळख पटली असून मयत तरुण हा यावल तालुक्यातील बामणोद येथील रहिवासी असून तो, वडनगरी येथे शिवमहापुराण कथेच्या ठिकाणाहून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. गणेश सीताराम पाटील (वय ३५, रा. बामणोद ता. यावल) असे मयत प्रौढाचे नाव आहे.(Body of missing adult found in Shiva Mahapuran katha jalgaon news)

गणेश सिताराम पाटील हा, यावल तालूक्यातील बामणोद गावात आई लीलाबाई, मोठा भाऊ संदीप, वहिनी, पुतण्यांसह एकत्र कुटूंबात वास्तव्यास होता. संदीप हा भाजीविक्रेता असून त्याला मयत गणेश पाटिल हा मदत करीत होता.

गेल्या आठवड्यात वडनगरी(ता.जळगाव) येथे प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथेत गुरुवार(ता. ७) रोजी गणेश पाटिल त्याच्या आईसोबत कथा ऐकण्यासाठी आलेला होता. कथेसाठी मंडपातच तो मुक्कामी राहिला नंतर मात्र, कथा संपल्यावर (ता.११) रोजी आई लीलाबाई यांना मुलगा गणेश सापडलाच नाही.

आई लिलाबाईने शोधाशोध केली. मात्र मुलगा न मिळाल्याने तो, घरी तर निघुन गेला नसावा म्हणून त्या घरी बामणोद येथे परत आल्या.

गणेशाचा मृतदेह गिरणा पात्रात आढळला.

गणेशच्या कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरु केली. पण तो मिळत नव्हता. दुसरीकडे जळगाव तालुका पोलीस स्टेशनला नागझिरा शिवारात गिरणा नदीपात्रात तरुणाचा मृतदेह मिळाला. तो त्यांनी शासकीय रुग्णालयात पाठविला. त्याची ओळख पटविण्यासाठी आवाहन केले.

त्याचा तपास सुरु होता. दरम्यान, गणेशच्या कुटुंबीयांनी शुक्रवार(ता. १५) रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव तालुका पोलीस स्टेशनला धाव घेत बेपत्ता झाल्याची नोंद करण्यास आले होते. तेव्हा पोलिसांनी त्यांना नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचा फोटो दाखविला.

लगेच गणेशच्या कुटूंबीयांनी घेत पोलिस शासकीय रुग्णालयातील पोहचले मृतदेह दाखविला तेव्हा गणेश पाटील याचा मृतदेह पाहताच कुटूंबीयांनी आक्रोश केला. तालूका पोलिसांत अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार अनिल फेगडे, संजय भालेराव, अनिल मोरे अशांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. तपास पोलिस नाईक लीलाधर महाजन करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT