rohan bhoi esakal
जळगाव

Jalgaon Accident News : दुचाकी अपघातात मुलगा ठार; वडील गंभीर

सुरत येथून दुचाकीने देवपिप्री (ता. जामनेर) येथे पुतण्याकडे वास्तूशांतीच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या पिता-पुत्राचा भीषण अपघात झाला. या घटनेत मुलगा ठार झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : सुरत येथून दुचाकीने देवपिप्री (ता. जामनेर) येथे पुतण्याकडे वास्तूशांतीच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या पिता-पुत्राचा भीषण अपघात झाला. या घटनेत मुलगा ठार झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत.

ही घटना गुरुवारी (ता. २१) सकाळी साडेसातच्या सुमारास तालुक्यातील करंजी शिवारातील उड्डाणपुलावर घडली. (Boy dead in bike accident jalgaon news)

राष्ट्रीय महामार्गावर सुरतहून दुचाकीने (क्रमांक जीजे ०५- एनटी ५२२६) पिता-पुत्र गावाकडे निघाले होते. मुलगा रोहन श्रावण भोई (वय २२) हा दुचाकी चालवत होता तर मागे वडील श्रावण भोई बसले होते. या वेळी करंजी शिवारातील उड्डाणपुलावर अपघात होऊन दोघे गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला ग्रामस्थांना पडलेले दिसले. त्यांच्या डोक्यास, चेहेऱ्यावर व हाता-पायांना गंभीर दुखापत झाली होती.

त्यांना रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर व सहकाऱ्यांनी पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून दुचाकीचालक रोहन श्रावण भोई याला मृत घोषित केले. मागे बसलेले श्रावण भोई (दोघे रा. सुरत) हे जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले आहे. या बाबत पारोळा पोलिसात विकास पाटील यांच्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गावाकडे जाताना काळाचा घाला

देवपिंप्री (ता. जामनेर) येथे शुक्रवारी (ता. २२) श्रावण भोई यांच्या पुतण्याकडे वास्तूशांतीचा कार्यक्रम होता. त्या साठी सुरत येथून पिता-पुत्र रात्री दुचाकीने निघाले होते. पारोळ्याजवळील करंजी गावाजवळ ही घटना घडली. त्यात मुलाचा मृत्यू तर वडील जखमी झाले. या घटनेने देवपिंप्री गावात हळहळ व्यक्त होत आहे. मयत रोहन भोई याचा सुरत येथे हॉटेलचा व्यवसाय असून, तो कुटुंबासह वास्तव्यास होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET SCAM : नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट ! सीबीआयच्या अटकेत असलेल्या मनीषा मांढरे यांचे कॉलेजकडून निलंबन

ITR Update: आयकर विभागाने जारी केले सर्व ITR फॉर्म! तुमच्यासाठी कोणता योग्य? ऑनलाइन रिटर्न कसा भराल? जाणून घ्या

Kerala CM VD Satheesan : कोण आहेत केरळचे नवे मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन? 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक...

Latest Marathi News Live Update : NEET पेपरफुटीचं प्रकरण तापलं, पुण्यात NSUI कडून आंदोलन, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Pune Hospital: माणुसकीला काळिमा! पुण्यातील हॉस्पिटल वाद चिघळला, १३ तासांचे बिल ३.२५ लाख, मृतदेह रोखून धरल्याचा आरोप, राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक..

SCROLL FOR NEXT