जळगाव

Jalgaon Crime News : 24 वर्षांपूर्वी अनाथ केल्याचा बदला घेतला मुलाने; भुसावळला पूर्ववैमस्यातून एकाचा खून

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : वयाच्या चार-पाच वर्षांचा असताना तब्बल वीस वर्षांपूर्वी पित्याचा खून करणाऱ्याला संपविण्याचा कट रचून काल भुसावळमध्ये हत्या झाल्याने पुन्हा एकदा भुसावळचे गुन्हेगारी विश्व चर्चेला आले आहे. मारेकऱ्यांची ओळख पटली असून, त्यापैकी एकाला पोटात चाकू लागला आहे, तर दुसऱ्याला अटक करण्यात आली आहे.

भुसावळ शहरात विजयादशमीच्या (ता. २४) मध्यरात्री दीडच्या सुमारास माहिती अधिकार कार्यकर्ता दिलीप रामलाल जोनवाल (वय ५४, रा. महात्मा फुलेनगर) यांची डोक्यात लोखंडी रॉड टाकून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. तपासपथकातील पोलिस आणि प्राप्त माहितीनुसार मृत दिलीप जोनवाल साधारण वीस वर्षांपूर्वी एका खुनाच्या गुन्ह्यात संशयित होते. (boy took revenge by killing father murderer jalgaon crime news)

त्या गुन्ह्यात कायदेशीर लढा आणि त्यानंतर सुटका झाल्यापासून ते सामान्य आयुष्य जगत होते. मात्र, वीस वर्षांपासून काळजात बदल्याची आग धगधगत असलेल्या तरुणाने पाळत ठेवून जोनवाल यांचा काटा काढल्याचे समोर आले आहे. अशाच पद्धतीने भुसावळ शहरात यापूर्वीही ‘खून का बदला खून’ या युक्तीनुसार सलग हत्या झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

अनाथ केल्याचा राग

जोनवाल यांच्या हत्येनंतर शहर पोलिस आणि गुन्हे शाखेने तपासचक्रे फिरवून साजिद सगीर खाटीक (भंगारवाला), आदिल दस्तगीर खाटीक अशा दोघांची नावे निश्चित केली. त्यापैकी साजिद भंगारवाला यास ताब्यात घेतले. आदिल दस्तगीर खाटीक हा रुग्णालयात दाखल आहे. त्याच्या पोटात अज्ञात व्यक्तीने चाकू खुपसून जखमी केल्याचे तो पोलिसांना सांगत आहे.

गुन्हा घडल्याच्या पूर्वी मी जळगावहून भुसावळला येत असताना दोन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याने मी जखमी झाल्याचे तो सांगत असला तरी, त्याच्या जखमा आणि त्याची माहिती पूर्णतः विरुद्ध आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने उलट चौकशी सुरू केल्यावर जखमी आदिल आणि साजिद खाटीक या दोघांनीच जोनवाल यांची हत्या केल्याचे समोर आले आहे.

वीस वर्षांपूर्वी खून

आदिल खाटीक याचे वडील दस्तगीर खाटीक यांचा २००३-०४ मध्ये खून करण्यात आला होता. तेव्हा तो पाच-सहा वर्षांचा चिमुरडा होता. आपल्या पित्याची हत्या करणाऱ्याबाबत तो सज्ञान झाल्यापासूनच माहिती संकलित करत होता. मृत दिलीप जोनवाल याने स्वतःचा मार्ग बदलून तो आता माहिती अधिकार कार्यकर्ता झाला होता.

तसेच एका रुग्णालयातही काम करत होता. त्याच्या येण्या-जाण्याच्या वेळा आणि इतर माहिती संकलित करून आदिल व त्याचा चुलत भाऊ साजिद दोघांनी त्याला मंगळवारी रात्री गाठले. लोखंडी रॉड (पाइप)ने त्याच्या डोक्यात प्रहार करून मेंदूच बाहेर काढल्याने तो जागीच मृत्युमुखी पडला. वीस वर्षांपूर्वीच्या पित्याच्या खुनाचा बदला घेतल्यावर आदिल पसार झाला.

हल्ल्याचा बनाव

आदिल खाटीक याच्या पोटात चाकूचे वार झालेले असून, त्याची पोलिसांनी चौकशी केल्यावर तो वेगळीच माहिती सांगतोय. मात्र, लागलेली ताजी जखम आणि हत्येची वेळ जुळून येत असल्याने जोनवाल यांची हत्या त्यानेच केली असावी. त्याचप्रमाणे झटापटीत किंवा त्याने स्वतःच चाकू खुपसून रुग्णालयात दाखल झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक किशन नजन पाटील, सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT