sakal
sakal
जळगाव

जळगाव : यंदाही ब्रह्मोत्सव साधेपणाने साजरा होणार

सकाळ वृत्तसेवा

पारोळा : येथील बालाजी संस्थांनतर्फे दरवर्षी ब्रह्मोत्सव घटस्थापनेपासून साजरा करण्यात येत असतो. पण यावर्षी ही कोरोनाचे सावट असल्याने यंदा ही वहन व रथोत्सव मिरवणूक निघणार नाही. धार्मिक उत्सव परंपरेने साध्या पद्धतीने सप्तमीची व समारोपाची अश्या दोन पालख्या व पाच पाउल रथ ओढुन साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती बालाजी मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विश्वस्त मंडळाने माहिती दिली.

सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या संकटात वहन व रथाच्या मिरवणुकी चे चाके थांबल्याने भक्तामध्ये नाराजी पसरली आहे. पारोळा येथील बालाजी मंदिर हे प्रति तिरूपती म्हणुन ओळखले जाते. या मंदिरात दरवर्षी घटस्थापनेपासुन ते कोजागीरी पोर्णिमेपर्यंत मोठ्या उत्साहात यात्रोउत्सव (रथोउत्सव) साजरा केला जातो. परंतु मागील दोन वर्षापासुन या यात्रोउत्सवावर कोरोनाचे संकट असल्याने मंदिरे बंद आहेत.

घरोघरी श्री बालाजी महाराजांचा प्रसाद वितरीत होणार

शासनाने राज्यातील मंदिरे 7 तारखेपासून सुरू होत.असल्याने पारोळा येथील बालाजी मंदिर देखील या दिवसापासुन भक्तांसाठी खुले होणार आहे. यावेळी भाविकांनी दर्शनास येताना कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. यात सोशल डिस्टन्स ठेवावे, मास्क शिवाय मंदिरात प्रवेश मिळणार नाही. याची खबरदारी घ्यावी. तसेच मागच्या वर्षाप्रमाणे या वर्षी ही संपुर्ण शहरात प्रसादाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

शहरातील केबल नेटवर्कद्वारे श्रींचे दर्शन घर बसल्या होणार असल्याने भाविकांनी मंदिरात गर्दी करू नये. असे आवाहन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे. याप्रसंगी मंदिराचे मुख्य विश्वस्थ श्रीकांत शिंपी, माजी खासदार ए.टी.पाटील, कार्याध्यक्ष रावसाहेब भोसले, माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, विश्वस्त केशव क्षत्रिय अनिल गुजराथी, संजय कासार, दिनेश गुजराथी, रमेश भगवती, प्रकाश शिंपी, चंद्रकांत शिंपी, नगरसेवक नितीन सोनार, भाजपा तालुकाध्यक्ष अँड.अतुल मोरे, शहरध्यक्ष मुकुंदा चौधरी, सचिन गुजराथी, नरेद्र राजपुत,समीर वैद्य यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Chennithala : मतदारांचा कल ‘इंडिया’ आघाडीकडे

Loksabha Election 2024 : मोदी, ठाकरे, गांधी, पवार यांचीच हवा

Election Commission : निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानस्नेही कारभाराला प्राधान्य

Devendra Fadnavis : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग नगरपर्यंत नेणार

Success Story : पोरीची जिद्दच लय मोठी! अपघातात हात गमावला तरी अनामता डगमगली नाही, बोर्डात मिळवले ९२ टक्के मार्क्स

SCROLL FOR NEXT