Bribe Crime esakal
जळगाव

Crime Update : दीड लाखांची लाच मंडळ अधिकारी सह तलाठी जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : दोन महिन्यांपूर्वी माती वाहतूक करताना सापडलेले डंपर सोडण्यासाठी दीड लाख रुपये घेताना मंडलाधिकारी व तलाठी यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना बुधवारी (ता.१३) दुपारी दीड वाजेच्या सुमारास तलाठी कार्यालयात घडली.

अमोल बेहरे हा बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय करतो. काही दिवसांपूर्वी त्याने डंपर (क्रमांक : एम एच १८ एए ११५३) करारावर घेतले होते. दोन महिन्यांपूर्वी माती वाहतूक करताना महसूल पथकाने पकडल्यानंतर तहसील आवारात डंपर जमा करण्यात आले होते.(Bribe of one and a half lakhs case Arrest Talathi Bribery Board officials Jalgaon News)

हे डंपर सोडविण्यासाठी शहर तलाठी गणेश राजाराम महाजन (वय ४६, रा. पाळधी ता धरणगाव) व मंडलाधिकारी दिनेश श्यामराव सोनवणे यांनी मंगळवारी (ता.१२) दीड लाख रुपयांची मागणी केली.

आज तक्रारदाराकडून दीड लाख रुपये रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शशिकांत पाटील, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, महिला कॉन्स्टेबल शैला धनगर, जनार्दन चौधरी, किशोर महाजन, बाळू मराठे, सुनील वानखेडे, ईश्वर धनगर, महेश सोमवंशी, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, सचिन चाटे, गणेश ठाकूर, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने दोघांना पकडले. दोघा संशयितांना चौकशीसाठी जळगाव येथे नेण्यात आले. उशिरापर्यंत संशयितांच्या घराची झडती घेतली जात होती. पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT