Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : 1 लाखासाठी विवाहितेचा छळप्रकरणी चाळीसगावात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : येथील छत्रपती संभाजीनगरातील विवाहितेचा कर्ज फेडण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे, या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

येथील छत्रपती संभाजीनगरात राहणाऱ्या २५ वर्षीय विवाहितेचा २०१७ मध्ये धुळे येथील शिरूड गावातील भूषण देविदास चौधरी यांच्याशी विवाह झाला. सुरवातीला पतीसह सासरच्या मंडळींकडून चांगली वागणूक मिळाली.(Case has been registered in Chalisgaon in case of harassment of a married woman for 1 lakh Jalgaon Crime News)

त्यानंतर कर्ज फेडण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे, यासाठी तगाडा लावून शारीरिक व मानसिक छळ करायला सुरुवात केली. आई-वडिलांची परिस्थिती हलाखीची असल्याने विवाहितेने नकार दिला.

त्यावर सासरच्या मंडळींकडून चापटबुक्यांनी मारहाण करून मुलांसह विवाहितेला घराबाहेर हाकलून देण्यात आले. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात पती भूषण देविदास चौधरी, सासू कमलबाई देविदास चौधरी, सासरे देविदास लक्ष्मण चौधरी, दीर ईश्वर देविदास चौधरी, नणंद सुनीता दत्तात्रय चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT