crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अंतुर्ली येथील तिघांविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : कासोदा (ता. एरंडोल), ता. १७ : सरपंचाला जातिवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता.१३) अंतुर्ली खुर्द (ता. एरंडोल) येथील तीन जणांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(case of atrocity has been registered against 3 people from Anturli jalgaon crime news)

गावात पिण्यासाठी पाणीपुरवठा होत असलेल्या विहिरीतील पंपाला कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने वीजतारांवरील आकडे काढून टाकण्याबाबत समजविण्यासाठी सरपंच कांतीलाल सोनवणे, उपसरपंच गौरव पाटील, राहुल पाटील, महेंद्र पाटील हे येथील देविदास पाटील यांच्या शेतात गेले.

त्यांना देविदास पाटील यांच्यासह त्यांचे दोघे मुले मनोज पाटील व मधुकर उर्फ आबा पाटील यांनी जातीवाचक शिवीगाळ केली. मनोज पाटील याने लाकडाने मारहाण करून उपसरपंच गौरव पाटील यांच्या हाताला गंभीर दुखापत केली .

त्यांच्यासह राहुल पाटील व महेंद्र पाटील यांना देखील जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करत गंभीर दुखापत केल्याने सरपंच कांतीलाल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देविदास सुखलाल पाटील, मनोज उर्फ बाळा देविदास पाटील व मधुकर उर्फ आबा देविदास पाटील यांच्याविरोधात कासोदा पोलिस ठाण्यात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिस उपअधीक्षक अभयसिंह देशमुख तपास करीत आहेत. त्यांना कासोदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे मदत करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

Milk Rate : पुणे जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना १ रुपयाचा दूधदर फरक; वार्षिक उलाढाल ३८७ कोटीवर

SCROLL FOR NEXT