murder 
जळगाव

Jalgaon Crime : तरुणाच्या मृत्यू प्रकरणी एकाविरोधात खुनाचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime : लोणे भोणे फाट्याजवळ नाल्यात तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता.

एप्रिलमध्ये ही दुर्घटना होऊन तरुणाच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने दहिवद येथील एकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case of murder against one in death of young man jalgaon crime news)

तालुक्यातील दहिवद खुर्द येथील प्रवीण पांडुरंग पाटील याला २२ एप्रिल २०२३ ला रात्री नऊला त्याचा मित्र अशोक उर्फ रिंकू प्रकाश पाटील (वय २८) याने मोटारसायकलवर बसवून बाहेर नेले होते. २३ एप्रिलला सकाळी प्रवीण याचा मृतदेह लोणे भोणे फाट्याजवळ नाल्यात आढळून आला होता.

त्यांच्या अंगावर, डोक्यावर, डाव्या बाजूस कपाळावर, दाढीवर, मांडीवर, उजव्या गुडघ्यावर, छातीवर जखमा आढळून आल्या होत्या. घटनास्थळी पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी भेट दिली होती. त्याचा संशयित मृत्यू झाल्याने प्रवीणची आई व नातेवाइकांनी संशयिताला अटक करण्याची मागणी केली होती.

प्रवीण २३ ला सकाळी सहापर्यंत घरी आला नव्हता म्हणून आई इंदूबाई पांडुरंग पाटील हिने गणेश श्रीराम पाटील यांच्या फोनवरून मुलाबाबत अशोक ऊर्फ रिंकूला चौकशी केली असता, त्याने फोन बंद करून ठेवला होता. त्यामुळे आईचा संशय बळावला होता. प्रवीण पुलावरून खाली नाल्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.

प्रवीणची आई इंदूबाई व नातेवाइकांनी जिल्हा पोलिस अधीक्षक व एलसीबी पथकाच्या भेटी घेऊन रिंकूवर संशय व्यक्त केला होता. अखेर इंदूबाई यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने १५६(३) प्रमाणे रिंकू ऊर्फ अशोक याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर अमळनेर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक विकास शिरोळे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर

SCROLL FOR NEXT