torture esakal
जळगाव

Jalgaon Crime News : विवाहिता, मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर (जि. जळगाव) : तालुक्यातील नीम येथील विवाहितेने आपल्या मुलीसह ४ ऑक्टोबर २०२२ ला विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

या प्रकरणी तिच्या घरासमोरील एकाने प्रेमसंबंध ठेवत सोन्याची बाळी घेऊन फोटो आणि व्हाइस रेर्काडिंग व्हायरल केल्याची धमकी दिल्याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case registered for inciting married woman to commit suicide Jalgaon Crime News)

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

नीम येथील समाधान जहागीर कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की पत्नी जयश्री समाधान कोळी (वय ३५) हिने मुलगी नंदिनी समाधान कोळी (वय ७) हिला घेऊन ४ ऑक्टोबरला विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. घरासमोर अशोक गटलू कोळी राहतो. त्याला पत्नीने तिची ५ ग्रॅमची बाळी दिली होती.

याबाबत तिने दीर हिरालाल व सासू हिराबाई यांना सांगितले होते. त्यांनी ती बाळी मागितली असता त्याने बदनामी करण्याची धमकी दिली होती. त्याला समजून सांगितल्यानंतर त्याने बाळी दिली नाही, असे फोटो व रेर्काडिंग नसल्याचे सांगितले.

तर ३ ऑक्टोबरला आई हिराबाई संप्तश्रृंगी गडावर गेली असताना सायंकाळी पाचच्या सुमारास पत्नीने अशोक हा बदनामीची धमकी देत असल्याने मी माझे जिवाचे बरे वाईट करून घेईल. दुसऱ्या दिवशी तिने कळमसरे (ता. अमळनेर) गावाबाहेरील नीम रस्त्यावरील जैन यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूस अशोक जबाबदार असल्याने या प्रकरणी मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT