Chalisgaon Market Committee
Chalisgaon Market Committee esakal
जळगाव

Jalgaon Bazar Samiti : चाळीसगाव बाजार समिती सभापतिपदासाठी चुरस; जुन्या, अनुभवींना संधी मिळण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

भिकन वाणी : सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : गेल्या महिन्यात बाजार समितीच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांच्या शेतकरी पॅनलने १५ जागा जिंकून निर्विवाद सत्ता मिळवली. त्यामुळे येत्या सोमवारी (ता. २२) होऊ घातलेल्या सभापतिपदाच्या निवडीसाठी कमालीची चुरस निर्माण झाली आहे. (Chalisgaon Bazar samiti Chairman is selected on 22 may jalgaon news)

दरम्यान, स्व. रामराव जिभाऊ स्मृती शेतकरी पॅनलचे सर्वेसर्वा, आमदार मंगेश चव्हाण यांच्या भूमिकेकडे बाजार समितीच्या सभासद, शेतकरी व विद्यमान संचालकांचे लक्ष लागून आहे.

आमदार चव्हाण यांची पाच वर्षांत पाच सभापती करण्याची भूमिका असून, त्या दृष्टीने बाजार समितीमध्ये निवडून आलेल्या जुन्या व नव्या चेहऱ्यांपैकी प्रथम सभापतिपदी कोणाला संधी दिली जाते, या दृष्टीने विचारपूर्वक निर्णय घेतला जाणार आहे.

सन २०२४ मध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने तालुक्यात मते खेचणारा सभापती होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, १५ संचालकांमध्ये मच्छिंद्र राठोड (वलठाण), रवींद्र पाटील (उंबरखेड), किशोर पाटील (करंजगाव) हे तीन जुने संचालक पुन्हा विजयी झाले आहेत.

तर नवीन चेहऱ्यांमध्ये प्रभाकर जाधव (चाळीसगाव), नवल पवार (दहिवद), कपिल पाटील (बहाळ), प्रदीप पाटील (डोणदिगर), रवींद्र पाटील (नांद्रे), राहुल पाटील (वाघडू), हेमराज पाटील (ब्राह्मणशेवगे), शैलेंद्रसिंग पाटील (शिदवाडी), साहेबराव राठोड (तळोदे प्र.चा.), नीलेश वाणी (उंबरखेड), प्रभाकर घुमरे (खरजई) आणि महिलांमध्ये वनिताबाई पाटील (कळमडू) यांचा समावेश आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, गेल्या आठ वर्षांपूर्वी (सन २०१५ मध्ये) झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत सुद्धा तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेनेचे पॅनल विजयी झाले होते. तीच परंपरा आमदार चव्हाण यांनी सुरू ठेवली आणि गेल्या महिन्यात झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या सहकार्याने १७ पैकी १५ उमेदवार विजयी करून आणले. त्यामध्ये एकमेव किंगमेकर आमदार चव्हाण ठरले.

गेल्या वेळी सभापतीपदासाठी चार पंचवार्षिक निवडून आलेले जुने व अनुभवी मच्छिंद्र राठोड यांची संधी हुकली आणि रवींद्र पाटील (उंबरखेड) यांनी बंडखोरी करून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या सहकार्याने सभापती झाले होते. त्यामुळे मच्छिंद्र राठोड यांना सभापती होण्याचा प्रथम मान मिळण्याची दाट शक्यता आहे.

रवींद्र पाटील यांनी २०१९ मध्ये आमदार चव्हाण यांच्यासाठी निवडणूक प्रचारामध्ये हिरीरीने भाग घेतला होता. त्यामुळे सभापतिपदाचा अनुभव लक्षात घेता वेळेवर पाटील यांचाही विचार होण्याची शक्यता आहे आणि किशोर पाटील हे सुद्धा आमदार चव्हाण यांचे जवळचे स्नेही असल्यामुळे त्यांनाही संधी मिळू शकते.

नवीन चेहऱ्यांमध्ये हेमराज पाटील (पिंटूदादा) यांनी निवडणुकीत आमदार चव्हाण यांच्या पॅनलकडून निवडणूक लढविली, तसेच भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष कपिल पाटील हे सुद्धा दावेदार आहेत. पाटील यांचे काका माजी सभापती रोहिदास पाटील यांचा पराभव झाल्यामुळे त्यांनाही संधी मिळू शकते.

शेवटी आमदार चव्हाण यांना जिल्हा दूध फेडेरेशन व जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता ते सहकाराचे ज्ञान, अनुभव, शेतकऱ्यांशी असलेला जनसंपर्क लक्षात घेता योग्य अनुभवी संचालकाची सभापतिपदी निवड करतील, यात शंका नाही. मात्र तीन जुन्या चेहऱ्यांमधील एका संचालकाची सभापतिपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT