Chandrakant Patil aggressive stance of MLA on school for teacher recruitment jalgaon news esakal
जळगाव

Chandrakant Patil News : एकनाथ खडसे यांच्याच पत्रामुळे पीकविमा मिळण्यात खोडा; चंद्रकांत पाटलांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

Chandrakant Patil News : राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँगेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनीच राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे, फळ पीकविम्याची बनावट कागदपत्रे करून लाभ घेतला जात आहे, त्याची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्यास विलंब होत आहे, असा आरोप आमदार चंद्रकांत पाटील व भारतीय जनता पक्षाचे नंदकुमार महाजन यांनी पत्रकार परिषदेत केला.

जळगाव येथे पद्मालय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष नीलेश पाटील उपस्थित होते. (Chandrakant Patil allegations on eknath khadse regarding crop insurance jalgaon news)

या वेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले, की श्री. खडसे यांनी, आमदार पाटील यांनी तक्रार केल्याने शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्यास विलंब होत असल्याचा आरोप केला होता; परंतु प्रत्यक्षात श्री. खडसे यांनीच कृषिमंत्री मुंडे यांना पत्र दिले आहे.

१३ ऑगस्ट २०२३ ला त्यांनी पत्र देऊन जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारावर फळ पीकविमा प्रस्ताव सादर करून फसवणूक केली जात आहे, या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. खडसे यांनी दिलेल्या या पत्रामुळे आता शासनाने चौकशी सुरू केली असून, त्यामुळे पीकविमा मिळण्यास विलंब होत आहे.

खडसे यांनी स्वत: पीकविम्याबाबत तक्रार केली; परंतु आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांचा पीकविमा थांबविल्याचा खोटा आरोप केला होता. .

यामुळे आपली मतदारसंघात विनाकारण बदनामी झाली; परंतु आता शेतकऱ्यांचा विमा मिळण्यात कोणी अडचण आणली, याचा पुरावाच आपण दिलेला आहे. शेतकऱ्यांना फळ पीकविमा मिळण्यास शासन सकारात्मक आहे; परंतु विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांना फळ पीकविम्याची रक्कम निश्‍चित मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

खडसेंनी पत्र दिले : नंदकुमार महाजन

भाजपचे नंदकुमार महाजन म्हणाले, की फळ पीकविमा मिळण्यात श्री. खडसे यांनीच अडचणी निर्माण केल्या असल्याची माहिती आपल्याला मिळाली. त्यानंतर आपण शासनाकडे पाठपुरावा केला. त्या वेळी कृषिमंत्री मुंडे यांना खडसे यांनी दिलेले पत्रच मिळाले आहे. त्यामुळे आता ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ झाले. खडसे हेच शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्यात अडचणी निर्माण करीत आहेत. दुसरीकडे आपण शेतकऱ्यांचे कैवारी असल्याप्रमाणे पीकविमा लवकर मिळण्यासाठी आंदोलन करीत आहेत. सरकारला ते विनाकरण बदनाम करीत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT