And or State President Chandrasekhar Bawankule speaking in the program in the library on Wednesday. Officials present in the second photograph. esakal
जळगाव

Chandrashekhar Bawankule : २०२४ ला या ठिकाणी शपथ घेणार भाजपचा मुख्यमंत्री.. प्रदेशाध्यक्षांनी केली मोठी घोषणा

सकाळ वृत्तसेवा

Chandrashekhar Bawankule : लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ‘महाविजय' मिळून केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील. तसेच ऑक्टोबर २०२४ ला महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होतील आणि नोव्हेंबर २०२४ ला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल.

त्यावेळी जळगाव शहर, ग्रामीण व अमळनेर येथील भाजपचे आमदार सोबत असतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (ता. २९) येथे केला.(chandrashekhar bawankule statement about 2024 Chief Minister jalgaon news)

पक्षाच्या ‘भावी' मुख्यमंत्र्यांचा नामोल्लेख श्री. बावनकुळे यांनी केला नाही. मात्र कार्यकर्त्यांनी ‘देवेंद्र पुन्हा एकदा....'अशा घोषणा दिल्या. जळगाव येथे मतदान केंद्रावरील भाजपच्या सुपर वॉरियर्सच्या बैठकीत श्री. बावनकुळे बोलत होते.

वल्लभदास वालजी वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीस खासदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश भोळे, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर जळकेकर, महानगराध्यक्ष उज्वला बेंडाळे, जळगाव लोकसभा क्षेत्रप्रमुख डॉ. राध्येश्‍याम चौधरी उपस्थित होते. श्री. बावनकुळे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून पक्षाचे ४५ खासदार निवडून येतील.

पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळामध्ये गिरीश महाजन शपथ घेतील. त्याचप्रमाणे मतदान केंद्राच्या बूथवर ५१ टक्यांपेक्षा अधिक मतदान असणाऱ्या सुपर वॉरियर यांना जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समिती व महामंडळावर प्रतिनिधित्व देण्यात येईल.

महाविजयाचा गुजरात पॅटर्न

गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता गेल्या ३० वर्षांपासून आहे, परंतु तेथील जिल्हा परिषदांसह सर्वच ठिकाणी पक्षाची सत्ता आहे. महाराष्ट्रात गुजरातचा पॅटर्न राबवण्यात येईल. त्यासाठी मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक सुपर वॉरियरला पुस्तक देण्यात आले आहे.

गुजरातला ज्या पद्धतीने काम करण्यात आले, ती पद्धत त्यात लिहिण्यात आली आहे. त्यानुसार आपण सर्वांनी काम करावयाचे आहे. त्यामुळे पुढील पंधरा वर्षे राज्यात भाजपची सत्ता राहणार आहे, असाही दावा करायला श्री. बावनकुळे विसरले नाहीत.

आपल्याला डिपफेकचा फटका बसला

सोशल मीडियावर सुरू असलेल्या डिपफेकचा उल्लेख करून श्री. बावनकुळे म्हणाले, की डिपफेकचा फटका मला बसला आहे. माझा परिवार गायब करून माझे छायाचित्र लावण्यात आले. त्यामुळे आगामी काळात कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर सावध असले पाहिजे. आपल्या नेत्यांविरुद्ध कुणी काही अपप्रचार केला जातो काय याकडे लक्ष दिले पाहिजे. आगामी निवडणुकीत भाजपविरुद्ध डिपफेकचा वापर मोठ्याप्रमाणात होणार आहे हे ध्यानात ठेवावे.

पुष्पगुच्छ नव्हे आता मफलर

भाजपच्या कार्यक्रमात आता कोणीही कोणाला पुष्पगुच्छ देणार नाही. यापुढे प्रत्येक सभेत पक्षाचे चिन्ह असलेला मफलर (पट्टा) गळ्यात घालण्यात येईल. याशिवाय आता गावात आणि प्रभागात नेत्यांचे नव्हे, तर बूथ प्रमुखांचे बॅनर लावा, अशा सूचना श्री. बावनकुळे यांनी केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT