esakal
जळगाव

Jalgaon News : चोपडा आगाराचा बदलणार ‘लूक’; सेल्फी पॉइंटचे आकर्षण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागातील सर्वांत मोठ्या आगारांपैकी प्रशस्त व विक्रमी उत्पन्नाच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या येथील आगाराचा ‘लूक’ बदलत आहे.

आगारात नियमित होणारी स्वच्छता, कामकाजात आलेला नीटनेटकेपणा यामुळे चोपडा आगाराने मे महिन्यात महामंडळाच्या मानांकनात महाराष्ट्रात उत्कृष्ट आगार म्हणून तिसरा क्रमांक पटकविला होता. (chopda bus stand look will change jalgaon news)

आता आगारात ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान राबविण्यात येत आहे. चोपडा आगाराचे व्यवस्थापक महेंद्र पाटील यांच्या प्रयत्नाने २००८ नंतर पहिल्यांदाच मे महिन्यात आगार सात लाखांनी नफ्यात आले आहे. तदनंतर जूनमध्ये नऊ लाखांनी नफ्यात आले.

तसेच यापुढेही आगार नफ्यात राहील, यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. चोपडा आगाराचे व्यवस्थापक महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगारात केवळ ७७ बस असताना देखील ग्रामीण, मुक्काम, शालेय फेऱ्या तसेच लांब पल्ल्याचे नियते यांचे दिवसाला ५१२ फेऱ्या होऊन २६ हजार किलोमीटरचे नियोजन करून चालकवाहक, अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांच्या कामकाजात सुधारणा करून उत्कृष्ट आगाराकडे वाटचाल सुरू केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच राज्य परिवहन महामंडळाकडून ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक’ अभियान राबविण्यात येत असल्याने त्या अनुषंंगाने आगारप्रमुख महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाने आगारासह कार्यशाळा व भिंतींना रंगरंगोटी करून दिशादर्शक, वेळापत्रक, फलके नव्याने लावून संपूर्ण परिसरात फुलझाडे, वृक्षारोपण करून फुलझाड्यांच्या कुंडीने आगार सजवून रोज स्वच्छता राबवून देखभाल केली जात आहे.

सेल्फी पॉइंटचे आकर्षण

आगारात तयार केलेले सेल्फी पाइंट विद्यार्थी व प्रवाशांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. तसेच विविध सामाजिक संस्थेच्या मदतीने आगाराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी पोटंट उतरवून व सजवून सुशोभिकरणाचे काम प्रगतिपथावर करण्यात येत असल्याने स्वच्छ व सुंदर बसस्थानकाकडे वाटचाल करताना दिसून येत आहे. आगारप्रमुख महेंद्र पाटील यांनी केलेल्या आमूलाग्र बदलाचे सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

किल्लारीचा प्रवास: १९९३च्या महाभूकंपातून भेगाळलेल्या जमिनीवर उभी राहिली भविष्याची स्वप्ने

SCROLL FOR NEXT