Chopra begins Mammography Jalgaon in Soon sakal
जळगाव

जळगाव : चोपड्याला ‘मॅमोग्राफी’ सुरू, जळगावात लवकरच

दहा रुग्णांवर उपचार, स्तनांतील गाठीचे निदान लवकर होणार

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात दोन मेमोग्राफी (Mammography) मशीन आलेल्या आहेत. धरणगाव येथील मशीन जळगावमध्ये आणण्यात येणार आहे. मोहाडी येथील रुग्णालयात ठेवण्यात येईल. पुढील महिन्यात त्याद्वारे रुग्णांवर उपचार सुरू होणार आहेत. या मशीनमुळे स्तनाच्या गाठीचे निदान लवकर करता येते. एकूण कर्करोग रुग्णांमध्ये स्तनाचा कर्करोग असण्याचे प्रमाण २८ टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे. त्यामुळे रुग्णांच्या हितासाठी हे मॅमोग्राफी मशीन खूप महत्त्वाचे आहे. गरीब व गरजू रुग्णांना याचा लाभ होण्यासाठी हे मशिन आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. चोपडा येथे मॅमोग्राफी मशीन सुरू झाली आहे. १० रुग्णांवर उपचार झाले आहे.

स्तनांतील गाठींचे निदान लवकर झाल्यामुळे उपचार करण्यामध्ये वैद्यकीय पथकाला सुलभता प्राप्त होते. रुग्णाचे आयुष्य सुधारते. कोरोना महामारीपूर्वी या मशीन खरेदी झाल्या आहेत. त्याची तांत्रिक मान्यता नाशिकचे आरोग्य विभागाचे उपसंचालक यांच्याकडून झाल्यानंतर प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली होती. या मशीन धरणगाव, चोपडा येथे दिलेल्या आहेत. खरेदी झाल्यानंतर कोरोना महामारी सुरू झाल्यामुळे धरणगाव, चोपडा रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित झाले होते. त्यामुळे मशीन तेथेच होत्या.

आतापर्यंत १० रुग्णांवर उपचार

मॅमोग्राफी मशीन रुग्णहितासाठी खूप गरजेची आहे. यासाठी ई- टेंडर काढण्यात आले होते. जे न्यूनतम दर आले त्यानुसार पुरवठादारांना आदेश देण्यात आले. त्यानुसार मशीन खरेदी झाल्या होत्या. कोरोना महामारीनंतर आता सप्टेंबर महिन्यापासून चोपडा येथे मॅमोग्राफी मशीन सुरू झाली आहे. १० रुग्णांवर उपचार झाले असून २ जणांना बायोप्सीसाठी पाठविण्यात आले आहे. तेथे तज्ज्ञ डॉ. सोनाली जैन उपचार करतात. त्यासाठी येथील परिचारिका वर्गांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू

जिल्ह्यात १२० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर खरेदी करून रावेर मतदार संघातील उपजिल्हा रुग्णालयात वाटप करण्यात आले आहे. मशीनचे इंस्टॉलेशन करण्याचे काम सुरू असून तेथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT