Beating News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : 2 चोरट्यांना नागरिकांकडून चोप; संशयितांना केले पोलिसांच्या स्वाधीन

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : पिलखोड येथे घरासमोरून दुचाकी चोरून नेणाऱ्यास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केल्याची घटना ताजी असताना मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथेही चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या दोन चोरट्यांना नागरिकांनी सतर्कता दाखवत चांगलाच चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिले.

या चोरट्यांनी एका घरातून मोबाईल तसेच होम थिएटर लांबविले. या प्रकरणी दोघांविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (citizen beaten up 2 thieves in jalgaon crime news)

सुनील विश्वनाथ निकम (रा. मेहुणबारे) हे कुटुंबासह अशोक लक्ष्मण चौधरी यांच्या घरात भाड्याने राहतात. दरम्यान, रविवारी (ता. २३) पहाटे चारच्या सुमारास घरात झोपलेले असताना त्यांच्या आजेसासऱ्यांनी त्यांना झोपेतून उठवले व गल्लीतून कोणीतरी आवाज देत असल्याचे सांगितले.

सुनील निकम यांनी जाऊन पाहिले तर रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तींनी दोन जणांना पकडून ठेवले होते व ते निकम यांच्या घराच्या बाहेरील खिडकीत चढून काहीतरी चोरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे सांगितले.

हा प्रकार कळताच परिसरातील नागरिक धावले. त्यांनी दोन तरुणांची विचारपूस केली असता अब्दुल रहेमान मुश्ताक अहमद (वय २५, रा. पवारवाडी, मालेगाव) व सय्यद दानीश सय्यद फारुक (२५, रा. दत्तनगर, मालेगाव) असे सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या वेळी दोन संशयितांची नागरिकांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन लहान धारदार पट्टीचे चाकू व दुचाकी (एमएच १७, सीजी ३९४४) आढळून आली.

या वेळी संशयित सय्यद दानीश सय्यद फारुक हा तेथून पळू लागला असता नागरिकांनी त्याचा पाठलाग करताना तो जमिनीवर पडला. या वेळी सुनील निकम यांच्या शेजारी राहणाऱ्या गोकुळ छोटू शार्दूल यांच्या घरातून मोबाईल तसेच बाहेरील खोलीत ठेवलेला होम थिएटर चोरीस गेला आहे, असे शार्दूल यांनी सांगितले.

त्यामुळे दोघे चोरी करण्यासाठी आलेले आहेत, असा संशय आल्याने नागरिकांनी या दोघांना पोलिस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस कर्मचारी श्याम सोनवणे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT