Dignitaries from various fields gathered for a meeting organized for the demand of independent district.
Dignitaries from various fields gathered for a meeting organized for the demand of independent district.  esakal
जळगाव

Jalgaon News : चाळीसगाव स्वतंत्र जिल्हा करा; बैठकीत नागरिकांचा सूर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : चाळीसगाव स्वतंत्र जिल्हा निर्माण व्हावा, या मागणीसाठी येथील शासकीय विश्रामगृहात शहरासह जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता अशा विविध स्तरावर कार्यरत असणाऱ्या नागरिकांची ७ व ८ मेस बैठक घेण्यात आली. (citizen wants Chalisgaon independent district jalgaon news)

या बैठकीत चाळीसगाव जिल्हा संघर्ष समिती स्थापन करण्यासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सध्या महाराष्ट्र शासन अनेक नवीन जिल्हे निर्माण करण्याच्या विचाराधीन असून, त्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

चाळीसगाव तालुका हा जळगाव जिल्हा मुख्यालयपासून सुमारे १४० किलोमीटर अंतरावर आहे, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, धर्मादाय आयुक्त कार्यालय, परिवहन विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधीक्षक आदी अनेक जळगावच्या शासकीय कार्यालयांमध्ये तालुक्यातील हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत.

त्यासाठी सामान्य नागरिक, शेतकरी वर्ग, नोकरवर्ग, व्यापारी वर्ग आदी सर्वच घटकांसाठी चाळीसगाव जिल्हा निर्माण होणे, हे नितांत गरजेचे आहे. या सर्व बाबींचा विचार करून सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता अशा विविध स्तरावर कार्यरत असणाऱ्या नागरिकांची एक बैठक घेण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले :

चाळीसगाव जिल्हा संघर्ष समिती स्थापन करणे. या समितीची कोअर कमिटी निर्माण करण्यासाठी नियमित बैठका आयोजित करणे. नियोजित कोअर कमिटीच्या नेतृत्वात पुढील वाटचाल करणे. येत्या तीन दिवसांत होणाऱ्या बैठकांमध्ये कोअर कमिटीची नावे आणि नियम ठरविणे.

या प्राथमिक बैठकीत धर्मभूषण बागूल, लक्ष्मण शिरसाठ, गणेश पवार, वर्धमान धाडीवाल, उदय पवार, भीमराव खलाणे, अॕड. राहुल जाधव, अजिज खाटीक, प्रवीण वाबळे, रामलाल चौधरी, दिलीप घोरपडे, सुनील चव्हाण, मुराद पटेल, अजय कोतकर, तारकेश्वर परदेशी, श्रीकांत राजपूत, मनोज भोसले, हेमचंद्र चौधरी, कृष्णराव देशमुख, राहुल मोरे,

महेंद्र महाले, रवींद्र सूर्यवंशी आदी उपस्थित होते. बैठकीच्या आयोजनासाठी अजीज खाटीक यांनी परिश्रम घेतले. सर्व चाळीसगावकरांनी बुधवारी (ता. १०) होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन चाळीसगाव जिल्हा निर्माण संघर्ष निमंत्रक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT