A pile of stones fell on the road after the stone pelting by the social activists. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : एरंडोलमध्ये समाजकंटकांकडून दगडफेक; गाड्यांची तोडफोड

पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या २९ संशयितांना ताब्यात घेतले असून, काही जण फरारी झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरात एका गटातील समाजकंटकांनी सोमवारी (ता. २२) रात्री अकराच्या सुमारास दगडफेक करून गाड्यांची तोडफोड केली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी जाऊन दगडफेक करणाऱ्यांवर लाठीमार करून त्यांना पांगविले. सद्यःस्थितीत शहरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या २९ संशयितांना ताब्यात घेतले असून, काही जण फरारी झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. (city group of miscreants pelted stones and vandalized cars jalgaon news)

समाजकंटकांनी पोलिसांच्या गाडीवर देखील दगडफेक करून काचा फोडल्या. दगडफेकीत सहाय्यक पोलिस निरीक्षकासह चार नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत.

शहरातील गांधीपुरा भागातील शरद सुकदेव चौधरी या युवकास सोमवारी रात्री दहाच्या सुमारास एका गटातील दोन युवकांनी घरात घुसून मारहाण केली. त्यानंतर या युवकास मारण्यासाठी पन्नास ते शंभर युवकांचा जमाव त्याठिकाणी जमा झाला.

याबाबतची माहिती हवालदार अनिल पाटील यांना दूरध्वनीवरून प्राप्त झाली. घटनेची माहिती समजताच सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे, उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार अनिल पाटील, अकिल मुजावर, योगेश जाधव, मिलिंद कुमावत हे पोलिस वाहनाने घटनास्थळी दाखल झाले.

चुनाभट्टी परिसरात संशयित असलम रशीद पिंजारी यांच्यासह एका गटातील पन्नास ते शंभर युवक त्याठिकाणी जमा झाले होते. दुसऱ्या बाजूला देखील युवकांचा जमाव जमा झाला होता. पोलिसांनी युवकांच्या एका जमावाला थांबवून ठेवले. घोषणा देणाऱ्या युवकांना पोलिस समजाविण्याचा प्रयत्न करीत असताना युवकांनी पोलिसांवरच दगडफेक करण्यास सुरवात केली.

पोलिसांनी घटनेची माहिती पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांना देऊन अतिरिक्त पोलिसबळ घेऊन येण्याचे कळविले. अतिरिक्त पोलिसबळ आल्यानंतर पोलिसांनी संतप्त झालेल्या युवकांवर लाठीमार करून त्यांना पांगविले.

युवकांनी केलेल्या दगडफेकीत सहाय्यक पोलिस गणेश अहिरे यांच्यासह चार कर्मचारी व नागरिक किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी लाठीमार सुरू केल्यानंतर युवक पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना काही युवक खड्ड्यांमध्ये पडून जखमी झाले. त्यानंतर देखील युवकांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरूच ठेवली.

...अन् परिस्थिती नियंत्रणात

पारोळा, धरणगाव, कासोदा येथील पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांसह शहरात दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या २९ युवकांना ताब्यात घेतले असून, मुख्य संशयित असलम पिंजारी व त्याचे पंधरा ते वीस साथीदार घटनास्थळावरून फरारी झाले.

त्यानंतर एका गटातील युवकांनी ज्ञानदीप चौकात देखील दगडफेक करून मोटारसायकली आणि चारचाकी वाहनांची तोडफोड केली. तसेच कसाई मशीद परिसरात देखील दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

याबाबत हवालदार मिलिंद कुमावत यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी २९ संशयितांना ताब्यात घेतले आहे. फरारी असलेल्या मुख्य संशयितांसह अन्य फरारी झालेल्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट

तहसीलदार सुचिता चव्हाण देखील मध्यरात्री उशिरापर्यंत घटनास्थळी थांबून होत्या. शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, तीन दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहेत. मंगळवारी (ता. २३) सकाळी पोलिस अधीक्षक एस. राजकुमार यांनी शहरात भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपअधीक्षक सुनील नंदनवाळ शहरात तळ ठोकून आहेत.

अफवांवर विश्‍वास ठेवू नका

दुपारी चारच्या सुमारास आमदार चिमणराव पाटील यांनी पोलिस ठाण्यात भेट देऊन माहिती जाणून घेतली. शहरात वाद निर्माण करणाऱ्या समाजकंटकांविरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पोलिस प्रशासनाला केल्या.

शहरात विविध अफवा पसरविल्या जात असल्यामुळे प्रमुख बाजारपेठेसह अन्य भागातील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump ultimatum : ट्रम्प यांचा हमासला ४८ तासांचा अल्टिमेटम! ; म्हणाले, ‘’आता जर ऐकलं नाहीतर...’’

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Mehbooba Mufti Statement : ‘’लडाख, POKमध्ये Gen-Z… ’’ ; मेहबूबा मुफ्तींनी केलं मोठं विधान!

Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? ; पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT