Beating News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : चोरीच्या दुचाकी विक्रीचे पैसे खाल्ल्यावरून वाद; महर्षी वाल्मीक चौकातच तुंबळ हाणामारी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : चोरीची दुचाकी विक्रीतून पैसे खाल्ले व पोलिसांना आमचे नाव सांगितल्याच्या वादातून महर्षी वाल्मीक पुतळ्याजवळ घमासान हाणामारी झाली. महर्षी वाल्मीक चौकात पारस सोनवणे (वय २३) व त्याचा भाऊ अजय उभे होते. तेथे मनोज तायडे व नितेश तायडे दुचाकीवरून आले. (Clash at Maharishi Valmiki Chowk jalgaon crime news)

मनोजने पारस याला शिवीगाळ करून वर्षापूर्वी चोरीची दुचाकी विक्रीचे पैसे खाल्ले व पोलिसांना आमची नावे सांगितले, असे म्हणत काठीने मारहाण करून जखमी केले. नितेशने पारसचा भाऊ अजयला चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत पारस सोनवणे याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक रवींद्र पाटील तपास करीत आहे.

दुसऱ्या गटाची तक्रार

मनोज तायडे (रा. तानाजी मालुसरेनगर) व पारस सोनवणे यांच्यात घर खाली करण्यावरून भांडणाला सुरवात झाली. मंगळवारी (ता. ४) मनोज भाऊ नितेश याच्यासोबत दुचाकीवरून घराकडे जात असताना, वाल्मीकनगरात मंदिराजवळ पारस सोनवणे याच्यासह चार जणांनी मनोजला थांबविले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

‘तू आम्हाला घर का खाली करायला लावत आहे’, असे विचारून पारस सोनवणे यांच्यासोबत असलेल्या भय्या गजानन सोनवणे यांनी काठीने मनोजचे डोके फोडले.

अजय सोनवणे व विशाल सोनवणे यांनी मनोजचा भाऊ नितेशला मारहाण करून दुखापत केली. मारहाणीनंतर ‘आमच्या नादी लागला, तर तुझा मर्डर करू’, अशी धमकी दिली. याबाबत जखमीच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक किरण वानखेडे तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT