court order lifted moratorium on development works in Nevase taluka ahmednagar Aurangabad bench sakal
जळगाव

Jalgaon Crime : 50 लाखांच्या गैरव्यवहारप्रकरणी लिपिकाचा जामीन अर्ज फेटाळला

या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून संशयित समाधान दत्तात्रय पाटील याने अमळनेर येथील भाग न्यायालयात शुक्रवारी (ता. १२) अर्ज दाखल केला होता.

सकाळ वृत्तसेवा

चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) महाविद्यालयातील सहाय्यक लेखापाल समाधान दत्तात्रय पाटील (रा.भार्डू ता.चोपडा) याने ५० लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात २७ डिसेंबरला गुन्हा दाखल झाला आहे.

या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून संशयित समाधान दत्तात्रय पाटील याने अमळनेर येथील भाग न्यायालयात शुक्रवारी (ता. १२) अर्ज दाखल केला होता. मात्र भाग न्यायालयातील न्यायाधीशांनी समाधान पाटील याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. (Clerks bail application rejected in 50 lakh misappropriation case at chopada Jalgaon Crime)

शहरातील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) मध्ये समाधान दत्तात्रय पाटील हा सहाय्यक लेखापाल म्हणून नोकरीस होता. त्याने गेल्या आठ वर्षांत वेळोवेळी संगणकाच्या सॉफ्टवेअरमध्ये फेरफार करून ५० लाख रुपयांचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी मधून गैरव्यवहार केला असल्याची फिर्याद प्राचार्य व्ही. एन. बोरसे यांनी दाखल केली होती.

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहेत. संशयित समाधान पाटील यांनी १२ जानेवारीला अमळनेर येथील भाग न्यायालयात न्यायाधीशांसमोर अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता. हा अर्ज न्यायाधीशांनी फेटाळला. ॲड. बागूल यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT