CM Eknath Shinde with Devendra Fadnavis jalgaon daura esakal
जळगाव

CM Jalgaon Daura : केळीचे लाडू, बिस्कीट, चिप्स मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला! भरताची वांगीही देणार..

सकाळ वृत्तसेवा

CM Jalgaon Daura : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी (ता. २७) ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत जळगावला येत आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी जिल्हा प्रशासन करीत आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी खानदेशमध्ये प्रसिद्ध असलेल्या केळीपासून बनविलेले लाडू, बिस्कीट, चिप्स आदी पदार्थांनी भरलेली बास्केट तयार केली जात आहे. त्याची जबाबदारी विभागीय कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्याकडे दिली आहे. (cm jalgaon daura district administration is making preparations for welcome news)

जळगावची (खानदेश) केळी अख्ख्या जगात प्रसिद्ध आहे. यामुळे केळीपासून बनविलेल्या उपपदार्थांच्या तब्बल आठ ते दहा बास्केट (टोपली) बनविल्या जात आहे. सोबतच केळीपासून धागाही तयार केला जातो. तोही या वेळी दिला जाणार आहे.

जेणेकरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे केळी विषयाकडे अधिक लक्ष जाईल. केळीपासून तयार होणाऱ्या उपपदार्थांसाठी शासनाने विशेष दर्जा दिल्यास रोजगारनिर्मिती शक्य आहे, याची माहिती मंत्र्यांना दिली जाणार आहे. यासोबत आकर्षक केळी, भरिताची वांगीही दिली जातील.

बहिणाबाईंची गाणी

कवयित्री बहिणाबाई चौधरी सर्वांना ठाऊक आहेत. बहिणाबाईंची रचलेल्या कविता व गाण्याचे पुस्तके (साने गुरुजी लिखित) यावेळी मंत्र्यांना दिली जातील. यामुळे बहिणाबाईंच्या कार्याला अधिक उजाळा मिळेल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मुख्यमंत्री करणार ट्रॅक्टरवाटप

कृषी विभागाच्या योजनेंतर्गत महिला शेतकऱ्यांपैकी एका शेतकरी महिलेला मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ट्रॅक्टरवाटप हेाईल. एकूण २० कृषी वाहने, अवजारांचे या वेळी वाटप होईल. कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माहितीचे स्टँडी लावण्यात येणार आहे. तृणधान्य वर्ष असल्याने तृणधान्याच्या फायद्याचे स्टँडीही कृषी विभागातर्फे लावले जातील.

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनोख्या पद्धतीने (केळीचे उपपदार्थ असलेली बास्केट) स्वागत केले जाणार आहे. केळीपासून तयार होणाऱ्या उपपदार्थांना शासनाने मदत केल्यास रोजगारनिर्मिती शक्य असल्याचे शासनाला सांगण्याचा आमचा प्रयत्न असेल." -संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT