Shiv Sena Thackeray office bearers esakal
जळगाव

Shivsena : शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी हट्ट

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जिल्‍हा दौऱ्या आले असताना त्यांना भेटून निवेदन देण्याची मागणी करणाऱ्या शिवसेना ठाकरे (Thackeray) गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात अटक करुन त्यांची सुटका केली आहे. (CM was on district tour Shiv Sena Thackeray office bearers demanded to meet him give statements were detained by police jalgaon news)

सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात त्यांना भेटून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्याची तयारी केली होती. या संदर्भात त्यांनी तहसीलदारांना पत्र देऊन अधिकृत भेटीसाठी वेळ मागितला होता. तथापि, यावरून त्यांना आजपर्यंत वेळ मिळाला नव्हता.

तर, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कालच माध्यमांशी बोलतांना निवेदनासाठी दौरा हे योग्य ठिकाण नव्हे असे सांगितले होते. ठाकरे गटाने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून नंतर मुंबई येथे निवेदन द्यावे असे त्यांनी सुचविले होते.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

ठाकरे गटाचे नेते गुलाबराव वाघ सहकाऱ्यांसह आज दुपारी भोकर येथे दाखल झाले असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अटक केलेल्यांमध्ये गुलाबराव वाघ, नंदू पाटील, संतोष सोनवणे, उपजिल्हाप्रमुख अॅड. शरद माळी, विलास पवार, गजू महाजन, देवा तायडे यांना यांना

जळगाव तालुका पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले आहे. माजी नगराध्यक्ष तथा युवासेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश चौधरी यांना धरणगाव पोलिस स्थानकात बोलविण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT