Ganeshotsav 2023  esakal
जळगाव

Jalgaon District Collector : जिल्ह्यात ‘एक गाव, एक वॉर्ड, एक गणपती’ : जिल्हाधिकारी प्रसाद

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon District Collector : सामाजिक सलोखा वृद्धिंगत होण्यास व विधायक कामांना गती मिळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिक, गणेश मंडळे, सरपंच, नगरसेवक व सर्व पदाधिकारी यांनी ‘एक गाव, एक वॉर्ड, एक गणपती’ साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. (Collector Ayush Prasad appealed to take initiative to celebrate One Village One Ward One Ganpati jalgaon news)

राज्यात १९ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेस विरोध करणेसाठी, जनतेची एकजूट साधण्याकरिता व सामाजिक ऐक्य व सलोखा वृद्धिंगत करणेकरिता लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती सार्वजनिक स्वरूपात साजरी करण्यास सुरवात केली.

आज स्वातंत्र्याच्या अमृतकालामध्ये सामाजिक ऐक्य व सलोखा राखणे, ही देशाची आर्थिक व भौतिक प्रगती साधण्याची पूर्व अट झालेली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वर्तमानात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूळ उद्देशाचा विसर नागरिकांना पडत चालल्याचे दिसून येत आहे. गल्लोगल्ली स्थापन झालेली गणेश मंडळांच्या माध्यमातून बऱ्याचदा राजकीय व सामाजिक तेढ निर्माण झाल्याच्या घटना घडत असतात.

स्पर्धा, चर्चासत्र, महिलांसाठीचे उपक्रम

सार्वजनिक स्वरूपात साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवात विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, चर्चासत्र, महिलांसाठीचे उपक्रम, आरोग्य तपासणी, सांस्कृतिक कार्यक्रम, रचनात्मक कामांचे आयोजन करावे व उत्सवास बिभित्सपणा आणणारे फ्लेक्स, पोस्टर्स लावण्यास फाटा देण्यात यावा. या उत्सवात उत्कृष्ट काम करणाऱ्या गणेश मंडळांना, ग्रामपंचायतीस, वॉर्डास सन्मानित करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 : पाकिस्तानी वंशांच्या क्रिकेटपटूला T20 World Cup साठी भारताने व्हिसा नाकारला; सोशल मीडियावर लिहितो की...

Belly Fat Reduction: पोटाची चरबी कमी करायची आहे? हार्वर्ड डॉक्टरांकडून जाणून घ्या डाएटचं बेस्ट फॉर्मुला

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीर: दहशतवादी संबंधांच्या आरोपाखाली 5 सरकारी कर्मचारी निलंबित

Pandharpur Politics : 'आमदार आवताडेंनी पंढरपुरात भाजपचे सहा उमेदवार पाडले'; पराभूत महिला उमेदवाराच्या पतीचा गंभीर आरोप, अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Shiv Thakare: अखेर त्या अफवा खोट्या ठरल्या; शिव ठाकरेने सांगितलं 'त्या' व्हायरल फोटोमागचं सत्य

SCROLL FOR NEXT