Jalgaon District Collector Ayush Prasad  esakal
जळगाव

Jalgaon District Collector : ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ अभियान राबवा : जिल्हाधिकारी प्रसाद

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon District Collector : जिल्ह्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान राबविण्यात यावे‌, अशा सूचनाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी (ता. १८) येथे दिल्या.

दिव्यांग कल्याण अभियानाची आढावा बैठक शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता भारत चौधरी, तसेच अभियानाचे सदस्य उपस्थित होते. (Collector Prasad instructed to Carry out campaign Divyang Welfare Department Divyangacha Dari jalgaon news)

श्री. प्रसाद म्हणाले, की ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ या अभियानाचे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे ९ सप्टेंबरला आयोजन करण्यात यावे. या कार्यक्रमाची परिपूर्ण तयारी करण्यात यावी. या कार्यक्रमांचे नियोजन करताना पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता दिव्यांग लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

शासनाच्या इतर विभागांच्या अधिकाऱ्यांनी दिव्यांग लाभार्थ्यांना दिलेल्या लाभाची यादी दिव्यांग विभागाकडे सादर करावी. कार्यक्रमाच्या दिवशी दिव्यांग व्यक्ती हा ४० टक्के ते ६० टक्केच्या आतील असावा, वयोवृद्ध व लहान मुले, तसेच अतितीव्र दिव्यांग यांना बोलविण्यात येऊ नये, अशा सूचनाही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

श्री. प्रसाद म्हणाले, की दिव्यांग लाभार्थी यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यासाठी तालुकास्तरावरून नगर परिषद मुख्याधिकारी, गटविकासाधिकारी यांनी आपल्या स्तरावरून वाहनव्यवस्था करून दिव्यांग लाभार्थींना कार्यक्रमस्थळी पोचविणे व घेऊन जाण्याची जबाबदारी घ्यावी.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सदर अभियानाच्या दिवशी दिव्यांग लाभार्थ्यांना त्या दिवशी यूडीआयडी देण्याची व्यवस्था करावी. कार्यक्रमाचे परिपूर्ण नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: मतदार यादी गोंधळावरून रवींद्र चव्हाणांचा संताप, निवडणूक रद्द करण्याची मागणी; राजकारण पुन्हा तापलं!

इलेक्शन ड्युटी करणाऱ्यांच्या भत्त्यात मोठी वाढ, राज्य सरकारचा निर्णय, आता मिळणार दिवसाला 'इतके' रुपये....

IND vs SA, 2nd Test: रिषभ पंतला मैदानात पाहून आर अश्विन का झाला नाराज? म्हणाला, स्पष्ट संकेत...

Supriya Sule : 'धनंजय मुंडेंना पक्षातून काढून टाका'; वाल्मीक कराडवरील 'त्या' वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची अजिदादांकडे मागणी

Success Story: 'माेलमजुरी करणारा किशोर शिंदे झाला अधिकारी'; माऊलीला अश्रू अनावर, जिद्दीच्या जाेरावर आई-वडिलांचे स्वप्न साकार..

SCROLL FOR NEXT