Jalgaon: Gore Sena officials protesting for various demands. esakal
जळगाव

Jalgaon News : विविध आंदोलनांनी सोमवारी ‘कलेक्टोरेट’ गजबजले; मनसेचा पाण्यासाठी रास्ता रोको

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : आठवड्याचा पहिला वार असलेल्या सोमवारी (ता. १९) जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर विविध संघटनांच्या आंदोलनांनी दणाणला होता. मन्यारखेड्यातील पाणीप्रश्‍नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रास्ता रोको केले.

विविध मागण्यांसाठी निळे निशाण संघटना व गोर सेनेने धरणे आंदोलन करून प्रशासनाविरोधात निदर्शने केली, तर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनतर्फे उपोषण करण्यात आले. (Collectorate buzzing with various agitations on Monday Stop Manse way to water Blue Mark Demonstrations Gor Sena Movement Jalgaon News)

सोमवारी विविध संघटनांच्या आंदोलनांमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलकांची गर्दी झाली होती. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. या मुख्य रस्त्यावरील वाहतूक भास्कर मार्केट, आकाशवाणी चौक, सिंधी कॉलनीमार्गे वळविण्यात आली होती.

मन्यारखेडा पाणीप्रश्‍नावर मनसेचे तीव्र रास्ता रोको

मन्यारखेडा (ता. जळगाव) गाव १२ वर्षांपासून पिण्याच्या पाण्यापासून व विजेपासून वंचित आहे. गावात आजही कुठलीही विजेची सोय नसून पिण्यासाठी पाणी मिळत नाही. देशाला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे झाली आहेत. या भागात अजूनही वीज व पाण्याची सोय नाही.

याबाबत ५ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्या आला होता. त्याचाही उपयोग झाला नाही. त्यामुळे मनसेने आंदोलन तीव्र करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको केले. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.

आंदोलनानंतर मनसेचे जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, जनहित जिल्हाध्यक्ष चेतन आडळकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपशहराध्यक्ष आशिष सपकाळे, ललित शर्मा, महानगर संघटक जनहित प्रशांत बाविस्कर आदींनी प्रशासनास निवेदन दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आकाशवाणी चौकात गोर सेनेचे आंदोलन

विमुक्त जातीच्या प्रवर्गातील राजपूत भामटा या मूळ जातीचे बोगस प्रमाणपत्र काढून बिगर मागासवर्गातील लोकांनी सामाजिक आरक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक जागा, शासकीय नोकऱ्यांवर अतिक्रमण केले आहे.

याद्वारे मूळ राजपूत भामटा या मागास वर्गातील लोकांवर अन्याय होत असून, त्याविरोधात न्याय मागण्यासाठी गोर सेनेतर्फे सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याच मागणीसाठी गोर सेनेने २०१९ मध्ये महाराष्ट्रात एकाच वेळी ३०० ठिकाणी रास्ता रोको केले होते. त्यानंतर ११ मे २०२२ ला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढला होता.

त्यानंतरही शासनाने गोर सेनेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आजही रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात अरुण पवार, एकनाथ जाधव, चेतन जाधव, अभिजित चव्हाण, सुनील चव्हाण, अनिल नाईक यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

निळे निशाण संघटनेची रस्त्यावर निदर्शने

निळे निशाण सामाजिक संघटनेने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. नांदेड जिल्ह्यात जातीय द्वेषातून मारहाण होऊन अक्षय भालेराव या तरुणाचा मृत्यू झाला.

त्याप्रकरणी मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, भालेरावच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत द्यावी, यावल तालुक्यातील धुळे पाडा, काळाडोह, आसराबारी पाडा या गावांना ग्रामपंचायतीत साविष्ट करून नमुना क्रमांक आठला नोंद करावी, जळगाव जिल्ह्यातील २०११ पूर्वीची अतिक्रमित घरे नियमित करावीत, जिल्ह्यातील स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रासह अन्य कंपन्यांत नोकरी द्यावी यांसह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

राज्य शेतमजूर युनियनचे उपोषण सुरू

शासनाच्या सर्वांसाठी घरे या धोरणानुसार भूमिहिन शेतमजुरांना घरे देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.

मौजे असोदा, ममुराबाद, थोरगव्हाण व जिल्ह्यातील अन्य गावांमध्येही भूमिहीन बेघर शेतमजुरांची संख्या मोठी आहे. मात्र, त्यांना हक्काची घरे उपलब्ध नाहीत. शासनाने सर्वांसाठी घरे धोरण राबविले असताना, या मजुरांनाही घरे मिळणे त्यांचा हक्क होता. त्यासाठी व आसोदा गावातील जागेच्या प्रश्‍नासाठी संघटनेने हे आंदोलन सुरू केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Drone Delivery Service: दूध, किराणा, पॅकेजेस… सगळं थेट ड्रोनने घरी पोहोचणार! मुंबईत पहिली निवासी ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू होणार, पण कधी?

Property Tax : नियमीत करदात्यांना २५ टक्के सवलत द्या; अभय योजनेतून तीन दिवसात १५.२७ कोटी वसूल

Pune Water Supply Close : पुणे शहराच्या बहुतांश भागाचा पाणी पुरवठा गुरूवारी राहणार बंद

Deglur Nagarparishad Election : नगराध्यक्षपदासाठी ११ उमेदवारी अर्ज; तर नगरसेवकपदासाठी १८९ जणांचा अर्ज

SCROLL FOR NEXT