Road Development esakal
जळगाव

Jalgaon News |रस्त्यांच्या निकृष्ट कामांची चौकशी करणार : आयुक्त देविदास पवार

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील रस्त्यांच्या निकृष्ट कामाबाबत काही नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या आहेत. या कामांची चौकशी करून दोषी आढळल्यास मक्तेदारावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी दिली. (Commissioner Devidas Pawar statement on road construction inquiry jalgaon news)

महापालिकेच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांची कामे झाली आहेत. त्यातील काही कामे निकृष्ट असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

गेल्या आठवड्यात सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी महाबळ कॉलनी भागातील स्टेट बँक कॉलनी रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत सोशल मीडियावर समस्या मांडून चौकशीची मागणी केली होती.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

तसेच इच्छादेवी चौक ते पांडे डेअरी चौक रस्ता, एम. जे. कॉलेज ते गिरणा टाकी रस्त्याचे कामही निकृष्ट झाल्याच्या तक्रारी महापालिका शहर अभियंत्यांकडे आल्या आहेत. शिवाय इतर काही रस्त्यांबाबतही नागरिकांच्या तक्रारी आहेत.

याबाबत आयुक्त पवार यांनी सांगितले, की तक्रारी आलेल्या रस्त्यांच्या कामांची चौकशी करण्याबाबत प्रभारी शहर अभियंत्यांना आदेश दिले आहेत. त्यांच्यामार्फत चौकशी करून त्यांच्या अहवालानुसार संबंधित मक्तेदारावर कारवाई करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT