Jalgaon municipal commissioner Vidya Gaikwad latest news esakal
जळगाव

Jalgaon News : गटारींच्या निकृष्ट कामाचे बिल आयुक्तांनी रोखले

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिका आयुक्त (Commissioner) डॉ. विद्या गायकवाड यांनी पुन्हा पदभार घेतला आहे. त्यांनी कामाचा धडका लावला असून, गुरुवारी (ता. ९) विविध कामांची पाहणी केली. (Commissioner stopped bill for shoddy work of sewers jalgaon news)

यात गटारीचे निकृष्ट काम असलेल्या मक्तेदारांची बिले थांबविण्याचे आदेश दिले. दुसरीकडे चांगली कामे असलेल्या मक्तेदारांची बिले अदा करण्याचेही आदेश दिले.

आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच डॉ. गायकवाड यांनी विकासकामांबाबत विषय मार्गी लावण्याचा धडका सुरू केला आहे. शहरात काही मक्तेदारांनी रस्ते, गटारींची कामे केली. गुरुवारी अचनाक त्यांनी त्या कामांना अचानक भेटी दिल्या.

खासदार, आमदार निधीतून झालेल्या कामांचीही पाहणी त्यांनी केली. महाबळ भागातील गटारीतील पाण्याचा निचरा न काढता, निकृष्ठ दर्जाचे काम केल्याचे लक्षात येताच त्यांनी संबंधित कामाचे बिल थांबविण्याचे आदेश दिले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

प्रभागात करणार अचानक पाहणी

महापालिका आयुक्त आता प्रत्येक प्रभागात अचानक पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले. अचानक सकाळी विविध भागांत जाऊन साफसफाईची त्या पाहणी करणार आहेत. त्या ठिकाणी महापालिकेचे सफाई कामगार काम करीत आहेत की नाही, याचीही पाहणी करणार आहेत.

कर्मचारी कामावर आढळले नाहीत, तर त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येईल. मक्तेदारांचे कर्मचारी कामावर आढळले नाहीत, तर मक्तेदारावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : सरकारने लोकांची गैरसोय करुन आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला- आशुतोष रांका

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT