जळगाव

Cucumber Mosaic Virus : कुकुम्बर मोझॅक व्हायरस नियंत्रणासाठी समिती : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

केळीवरील कुकुम्बर मोझॅक व्हायरसची मंगळवारी पाहणी करताना जिल्हाधिकारी आयूष प्रसाद आदी.

सकाळ वृत्तसेवा

Cucumber Mosaic Virus : कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग यांची जिल्हास्तरावर संयुक्त समिती नेमून कुकुम्बर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही)च्या कायमस्वरूपी नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी प्रसाद यांनी फैजपूर (ता. यावल) परिसरातील केळी पिकावरील कुकुम्बर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) बाधीत क्षेत्राची मंगळवारी (ता. ३) पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. या भेटीत त्यांनी शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली व सीएमव्हीचे प्रभावीपणे नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. (Committee for Cucumber Mosaic Virus Control in jalgaon news)

हंबर्डी गावातील शेतकरी विलास चुडामण पाटील, न्हावी येथील शेतकरी सागर निळकंठ फिरके, निर्मला फिरके, आमोदा येथील शेतकरी दिलीप कोल्हे यांच्या केळी पिकाखालील बाधीत क्षेत्राची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.

या क्षेत्रभेटीवेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे, फैजपूर उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, यावल तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, रावेर तहसीलदार बंडू कापसे, यावल तालुका कृषी अधिकारी बी. व्ही. वारे, फैजपूर मंडळ कृषी अधिकारी सागर सिनारे, कृषी व महसूल विभागातील सर्व क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी, परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

केळी उत्पादक निर्यातदारांसाठी परिसंवाद

कृषीमित्र स्व. हरीभाऊ जावळे यांच्या ७० व्या जयंतीनिमित्त केळी उत्पादक आणि केळी निर्यातीसाठी इच्छुक शेतकरी व उदयोन्मुख उद्योजकांसाठी फैजपूर येथे आयोजित परिसंवादाचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. आंतराष्ट्रीय केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील यांनी केळीचे अन्नद्रव्य आणि करपा, पिटिंग व सीएमव्ही रोगाचे व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

केळी निर्यातदार किरण ढोके यांनी केळी उत्पादक ते केळी निर्यातदार यशस्वी वाटचालीविषयी अनुभव सांगितले. युवा केळी निर्यातदार बलरामसिंग सोळंके यांनी केळी निर्यातीसाठी आवश्यक नोंदणी प्रमाणपत्र, आयात, निर्यात प्रक्रिया बँक हमी आणि जागतिक व्यापार याबाबत मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

SCROLL FOR NEXT