Panchnama Sakal
जळगाव

पंचनामे करताना पैशांची मागणी केल्यास तक्रार करा

जिल्ह्यात ११५ विमा कंपनीचे प्रतिनिधी पंचनामे करीत आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात कृषी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करताना कोणी पंचनाम्यासाठी पैशांची मागणी केल्यास संबंधितांची थेट कृषी विभागाकडे तक्रार करा, जिल्ह्यात ८० टक्के पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाचे उपव्यवस्थापक अतुल झनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कृषी उपसंचालक अनिल भोकरे, सहाय्यक व्यवस्थापक नितीन कुमार, जिल्हा प्रतिनिधी कुंदन बारी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यात लोकप्रतिनिधींकडे शेतकरी तक्रार करतात, की विमा कंपनीचे प्रतिनिधी पंचनाम्यासाठी पैसे घेतात. मात्र शेतकरी लेखी तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांनी नुकसानीचा फोटो (जिओ टॅगिंग) काढून तो कंपनीकडे पाठवावा. जिल्ह्यात ११५ विमा कंपनीचे प्रतिनिधी पंचनामे करीत आहे. २० जूनपर्यंत स्पॉट पंचनामे पूर्ण होतील, अशी माहिती दिली.

बियाणे, खतांची टंचाई नाही

जिल्ह्यात सर्व प्रकारच्या बियाणे, खतांची उपलब्धता आहे. कोणत्याही प्रकारची टंचाई नाही. शेतकऱ्यांना कोणी टंचाई आहे, असे सांगत असेल तर त्याची कृषी विभागाकडे तक्रार करावी, त्याची नावे गुप्त ठेवण्यात येतील असे श्री. ठाकूर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Megablock: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मुंबई लोकलच्या ‘या’ मार्गांवर जंबो ब्लॉक; वेळापत्रकात फेरबदल जाहीर

RR vs RCB Live : ४,४,४,६,६... वैभव सूर्यवंशीचे १५ चेंडूंत अर्धशतक; ३००+ चा स्ट्राईक रेट अन् जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमारची बेक्कार धुलाई

Mumbai: आघाडीतील मैत्री धोक्यात? काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधील 'धुसफूस' चव्हाट्यावर; कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे रजेवर गेल्याने रुजू होता आले नाही, तेवढ्यात विनिता सिंघल यांची बदली रद्द; मुंढे नियुक्तीच्या प्रतीक्षेत

नूतन जिल्हाधिकाऱ्यांचा खत कंपन्यांना इशारा! संरक्षित खतसाठा न ठेवल्यास, लिंकिंग केल्यास कठोर कारवाई, रॅक पॉईंट उभारुन तालुक्यांना समान खत द्यावा

SCROLL FOR NEXT