crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : पोलिसाविरुद्ध विनयभंगाची तक्रार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील सिंधी कॉलनीत झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणात अटकेतील संशयिताच्या पत्नीचा पोलिसाकडून मोबाईलवर ‘मेसेज’ पाठवून विनयभंग झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.(Complaint of molestation against police in jalgaon crime news)

इम्रान असे संशयित पोलिसाचे नाव असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मार्च २०२० मध्ये झालेल्या हाणामारीत चाकूहल्ला झाला होता. या गुन्ह्यात आठ संशयितांना पोलिसांनी अटक केली होती.

त्यापैकी दोन सख्खे भाऊ होते. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कोठडीत ते होते. कोठडीत असताना त्यांना भेटण्यासाठी संशयिताची पत्नी व सासू पोलिस ठाण्यात आले असता त्या वेळी संबंधित पोलिसाच्या संपर्कात आले होते.

त्या ओळखीच्या आधारे संबंधित पोलिसाकडून मोबाईलवर ‘मेसेज' पाठवून आणि व्हिडिओ कॉलद्वारे विनयभंग करण्यात आल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. तसेच माझ्यासोबत संबंध ठेवले नाही, तर ‘रेकॉडिंग' तुझ्या पतीला ऐकवेन, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bailgada Sharyat: वेग, ताकद अन् जिद्दीला अखेरचा निरोप! पुणे जिल्ह्यात दबदबा असलेल्या ओम्या बैलाचं निधन

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune Traffic Issue : वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती; ‘रिअल टाइम डेटा’नुसार होणार अभ्यास

SCROLL FOR NEXT