Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon News : महापालिकेत आयुक्तपदाचा संभ्रम कायम

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिकेत आयुक्तपदाबाबत संभ्रम कायम आहे. मात्र, देविदास पवार यांनी सोमवारी (ता. ५) महापालिकेत त्यांच्या अधिपत्याखाली लोकशाही दिनानिमित्त कार्यक्रम घेतला. त्यानंतर मात्र ते जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी असल्याचे सागंण्यात आले. (confusion of post of Commissioner in jalgaon Municipal Corporation continues Latest Jalgaon News)

हेही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

महापालिकेत महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या बदलीला ‘मॅट’ने स्थगिती दिली आहे, तर दुसरीकडे देवीदास पवार यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. बदलीला स्थगिती असल्याबाबतचे ‘मॅट’च्या आदेशाची प्रत डॉ. विद्या गायकवाड यांनी आयुक्त देवीदास पवार यांना शुक्रवारी (ता. २) दिली होती.

त्यामुळे सोमवारी (ता. ५) याबाबत शासनाकडून काही तरी निर्णय येईल आणि आयुक्तपदाचा अधिकार कुणाला आहेत, याबाबत निर्णय होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, सोमवारी शासनाकडून याबाबत कोणतेही पत्र आलेले नाही. त्यामुळे आयुक्तपदाचे कामकाज देवीदास पवार यांनीच केले. त्यांनी लोकशाही दिनाचे काम केले. मात्र, अद्यापही त्यांनी कोणत्याही महत्त्वांच्या फाईलींवर स्वाक्षरी केली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

‘मॅट’ने महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या बदलीला स्थगिती दिली आहे. त्यावर ९ डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे आयुक्तपदी कोण? याबाबतचा निर्णय ९ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत देवीदास पवार हेच आयुक्तपदाचा कारभार सांभाळण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT