Jameel Sheikh esakal
जळगाव

Jalgaon News : ओबीसींसाठी 9 वर्षे भाजपने काय केले? काँग्रेसचे जमील शेख यांचा सवाल

सकाळ वृत्तसेवा

चोपडा (जि. जळगाव) : राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला, असा भाजपकडून खोटा आरोप केला जात आहे. नीरव मोदी, ललित मोदी हे ओबीसी समाजाचे नाहीत.

नऊ वर्षे ओबीसी समाजासाठी भाजप सरकारने काय केले? असा सवाल भाजप सरकारला काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तथा निरीक्षक जमील शेख (Jameel Sheikh) यांनी पत्रकार परिषदेत केला. (Congress Jameel Sheikh asked question to BJP government about what work done for obc community jalgaon news)

चोपडा येथे शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे, अजबराव पाटील, चिरागोद्दीन शेख आदी होते.

काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तथा निरीक्षक जमील शेख पुढे म्हणाले, की खासदार राहुल गांधी यांनी संसदेत ७ फेब्रुवारीला अदानी घोटाळ्याबाबत प्रश्न विचारला, अदानी उद्योग समूहातील गुंतवलेल्या शेल कंपन्यातील २० हजार कोटी रुपये कोठून आणले? हुकूमशाही व अफू खावून चालणारे सरकारविरोधी पक्षाला चुकीची वागणूक देत आहे.

सत्ताधारी पक्ष संसदेचे कामकाज चालू देत नाही. काँग्रेस पक्ष जेपीसीची मागणी करताच कामकाज स्थगित करण्यात आले. अदानीला वाचविण्यासाठी मोदी सरकार सर्व शक्ति पणाला लावत आहे. काँग्रेस ही ओबीसी समाजासोबत आजची नाही पहिल्यापासून सोबत आहे. भाजप ओबीसी समाजाचा संबंध भ्रष्टाचाऱ्यांशी जोडून ओबीसी समाजाचा अपमान करीत आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

या हुकूमशाही सरकारने आमच्या पक्षाचे खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली.२४ तासाच्या आत घर खाली करण्याची नोटीस पाठविली, ज्या गांधी घराण्याने आपली संपत्ती राष्ट्राला दान दिली त्यांना हे सरकार सांगत आहे घर खाली करा?

या वेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील म्हणाले, की खासदार राहुल गांधी यांनी देश जोडण्याचा संकल्प घेऊन चार हजार किलोमीटरची भारत जोडो ही पदयात्रा केली. ते एका जात समुदायाचा अपमान कशाला करतील? भाजप सरकार चोर, दरोडेखोर, घोटाळेबाज यांचा फर्दाफाश करणाऱ्या राहुल गांधी यांना लक्ष करून द्वेषापोटी कारवाई करीत आहे.

लोकशाही संविधान व देश वाचविण्याची ही लढाई आहे. काँग्रेस ही जनतेच्या दरबारात लढेल व विजयी होईल, असा विश्वास शेवटी त्यांनी व्यक्त केला. या वेळी बी. एम. पाटील, चोसाका संचालक गोपाळ धनगर, ॲड. एस. डी. पाटील, सूतगिरणी संचालक राजेंद्र पाटील, शरद धनगर, देवा पारधी, अशोक साळुंखे, आरिफ शेख आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Raju Shetti:'अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही': माजी खासदार राजू शेट्टी; शेतकऱ्यांवर गंभीर संकट, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

SCROLL FOR NEXT